Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांची उद्या प्रकट मुलाखत

इस्लामपूर / प्रतिनिधी : उरुण-इस्लामपूर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची प्रकट मुलाखत प्रसिध्द निवेदक

ऊस दराचा स्वतंत्र फॉर्म्युला शेतकर्‍यांच्या लुटीसाठी; 1 डिसेंबरला राजारामबापू कारखान्यात काटा बंद आंदोलन
नवी मुंबईत व्यंकटेश्वरा मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरे यांनी केले तिरुपती देवस्थानास सुपुर्द
विधानसभा अध्यक्षपदी आ. पृथ्वीराज चव्हाण यांची वर्णी शक्य

इस्लामपूर / प्रतिनिधी : उरुण-इस्लामपूर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांची प्रकट मुलाखत प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ घेणार आहेत. हि प्रकट मुलाखत रविवार, दि. 2 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृह येथे होणार असल्याची माहिती निशिकांतदादा युथ फौंडेशन व निशिकांतदादा स्पोर्टस फौंडेशनच्या पदाधिकारी यांनी दिली.
निशिकांत भोसले-पाटील यांची संघर्षमय वाटचाल, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील यशस्वी प्रवास, समाजकार्य, अलीकडील राजकारणातील प्रवास, गेल्या पाच वर्षातील शहरातील विकासात्मक वाटचाल व भविष्यातील व्हिजन या विषयाच्या अनुषगांने निशिकांत पाटील यांंच्या इतिहासातील घडामोडी व भविष्यातील वाटचालीची पाने मुलाखतीदरम्यान उघडली जाणार आहेत.
मुलाखतीचे थेट प्रेक्षेपण फेसबुक, ट्विवर, इस्टाग्राम, युट्युबवर पहाता येणार येणार, व्हॉटस् अ‍ॅप लिंक हि पाठवली जाणार आहे. तरी या कार्यक्रमास शहरातील नागरीक, सामाजीक संस्थेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिक्षण, आरोग्य क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाजपा वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशिल मोरे, वाळवा तालुका भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा शहर अध्यक्ष अशोकराव खोत, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, भाजपाचे जेष्ठ नेते मधुकर हुबाले, भाजप माजी तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई जगताप, स्मिता पवार, अजित पाटील, यदूराज थोरात, अक्षय पाटील, भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सतेज पाटील, संघटन सरचिटणीस प्रविण परीट, अक्षय कोळेकर, विकास परीट, सुयश पाटील, गौरव खेतमर, अल्ताफ तहसिलदार, मुकुंद रास्कर, संदीपराज पवार, कुलदीप खांबे, अशोक भिंगार्डे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते विशेष परीश्रम घेत आहेत.

COMMENTS