Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामानवांचा समतावादी विचार आपण अंगिकारला पाहिजे-आ.विजयसिंह पंडित; गेवराईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना अभिवादन

गेवराई : सामाजिक समता प्रस्थापित करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून शोषित, वंचित व उपेक्षित समाजाचा उद्धार करणे, हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आण

डॉ. आंबेडकर ज्ञान, स्वाभिमान आणि परिवर्तनाचे दीपस्तंभ : माजी आ. काळे
बेलापूरमध्ये बजरंग दलाच्यावतीने डॉ.आंबेडकरांना अभिवादन
केजमध्ये खा.बजरंग सोनवणे यांनी अर्पण केली महामानवाला मानवंदना!

गेवराई : सामाजिक समता प्रस्थापित करणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून शोषित, वंचित व उपेक्षित समाजाचा उद्धार करणे, हा भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले  दोन्ही महामानवांच्या कार्याचा समान धागा होता. जातीयतेची दरी मिटवून समाजातील प्रत्येक घटकाला आणि महिलांना समान अधिकार व मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी दोघांनीही अथक लढा दिला. अज्ञान आणि विषमतेविरुद्ध प्रहार करत समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवणार्‍या या महामानवांच्या समतावादी विचार आपण अंगिकारले पाहिजेत असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त भीमज्योती जन्मोत्सवा निमित्त बौद्धविहार  गेवराई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त भीमज्योती जन्मोत्सवा निमित्त बौद्धविहार, गेवराई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भीमज्योती जन्मोत्सवाचे अध्यक्ष  आ. विजयसिंह पंडित यांच्यासह कार्यकारिणीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. विजयसिंह पंडित यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन बुद्धवंदना घेण्यात आले. पुढे बोलतांना आ. विजयसिंह पंडित म्हणाले की, आजच्या तरुण पिढीने या महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार करावा व त्यांच्या विचारांचे आचरण आपल्या कृतीतून दाखवून द्यावे असे आवाहन त्यांनी केले. अभिवादन समारंभाला रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष किशोर कांडेकर, सार्वजनिक भिमज्योती जयंती सोहळ्याचे उपाध्यक्ष  रवींद्र बोराडे,  शायदाद भाई, कार्याध्यक्ष खाजामामु, सचिव सय्यद एजाज, सहसचिव रंजीत घुंबार्डे, गजानन काळे, कोषाध्यक्ष विलास सुतार, निजाम भाई, सहकोषाध्यक्ष  मायकल सुतार, संघटक  बप्पा बेद्रे, सहसंघट देवा जोशी, सल्लागार बाबा पिसाळ, दादासाहेब चौधरी, बंटी सौंदरमल, धम्मा सौंदरमल, धम्मा ढोले,हभरत सौंदरमल, महेश सौंदरमल, सुनील दिगंबर कांडेकर, विनोद सौंदरमल, विनोद गायकवाड, प्रकाश साळवे, दीपक निकाळजे, सचिन कांडेकर, नितीन वीर, पिंटू साळवे, संकेत कांडेकर, गौतम कांडेकर, जीवन साळवे, अनिकेत कांडेकर, मिलिंद सौंदरमल, गौतम वसंत कांडेकर, राजेश कांडेकर, सतीश प्रधान, सोमनाथ पाटेकर, धनंजय कांडेकर, संदिप मडके, दत्ता दाभाडे, दत्ता जाधव, नितीन सोनवणे यांच्यासह  समाजबांधव व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
रिक्षा युनियनच्या वतीनेही महामानवांना अभिवादन
गेवराई शहरात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीचे आयोजन छत्रपती राजर्षी शाहू महाराज ऑटो रिक्षा युनियन यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी आ. विजयसिंह पंडित,  कडूदास कांबळे, ड. सुभाष निकम, माजी नगरसेवक श्यामकाका येवले, विकास गायकवाड, नगरसेवक शेख ख्वाजा मामू, विनोद सौंदरमल, संतोष सुतार, सोमेश्वर कारके, ड गौतम कांडेकर, निजामभाई, सय्यद बाबुभाई  राजेभाऊ साळुंखे, प्रभाकर भालशंकर, प्रकाश गायकवाड, युनियनचे अध्यक्ष सतीश प्रधान यांच्यासह भोले शंकर, सुतार, अक्षय शिंदे   जाधव सरकार, सुनील पवार, संदीप पवार  संदीप काळे, राजू भाई, अमरभाई सतीश राठोड, संतोष राठोड, मसूर भाई, प्रकाश गायकवाड, आदित्य कारके, आप्पा मस्के, संजय चव्हाण  बप्पा पाटोळे, संतोष पवार, प्रशांत केदार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS