Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त ‘शिवा’ची भव्य मिरवणूक; विचारमंथनातून समाजप्रबोधन

नांदेड : ‘शिवा’ अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्या

जे बोलतो ते करतो; आरोग्य व शिक्षणासाठी माझी बांधिलकी कायम-खा.डॉ. गोपछडे
कुंडलवाडीच्या विकासासाठी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा
14 ते 15 वयोगटातील मुलींसाठी मोफत एचपीव्ही लसीकरण शिबिराचे आयोजन

नांदेड : ‘शिवा’ अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या वतीने क्रांतीसूर्य, जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त काढण्यात आलेली भव्य मिरवणूक हे प्रमुख आकर्षण ठरले. मिरवणुकीनंतर आयोजित जाहीर सभेत महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचे सखोल मंथन करण्यात आले.
यंदा ‘शिवा’ संघटनेच्या वतीने साजर्‍या होणार्‍या जयंतीचे हे रौप्यमहोत्सवी (25 वे) वर्ष असल्याने विशेष तयारी करण्यात आली होती. सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला. या वेळी खा.रवींद्र चव्हाण, माजी आ. अमरनाथ राजूरकर (स्वागताध्यक्ष), माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती संजय बेळगे, भाजप प्रवक्ते संतोष पांडागळे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख बबन बारसे आदी मान्यवर उपस्थित होते. मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यासमोर पोहोचली. तेथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेच्या अध्यक्षस्थानी ‘शिवा’चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे होते. उद्घाटक म्हणून राज्यसभा खा. डॉ. अजित गोपछडे, आ. राजेश पवार, माजी आ. अमरनाथ राजूरकर, महापौर कविता मुळे, तसेच विविध पदाधिकारी व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात प्रा. मनोहर धोंडे यांनी बसवकल्याण येथील महात्मा बसवेश्वरांच्या मूळ अनुभव मंडप व परसु कट्टा यांच्या मुक्ततेसह बसवेश्वर जयंतीला देशभर शासकीय मान्यता देण्याच्या मागण्या मांडल्या. या मागण्यांसाठी लवकरच दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘शिवा’ संघटनेतर्फे भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. समाजकल्याणासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना खा. डॉ. अजित गोपछडे यांनी ‘शिवा’ संघटनेच्या कार्याचे कौतुक करत वीरशैव लिंगायत समाजाच्या विकासासाठी विविध योजना राबविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगितले. स्वागताध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा गौरव करत 12व्या शतकात त्यांनी आंतरजातीय विवाह घडवून आणून लोकशाहीची पायाभरणी केली व महिलांना समान हक्क दिल्याचे नमूद केले. यावेळी आ. राजेश पवार, महापौर कविता मुळे, संतोष पांडागळे, अनिल पाटील निमटेककर, आयएएस अधिकारी ऋषिकेश पालीमकर आदींचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठलराव ताकबिरे यांनी केले, तर सूत्रसंचालन संजय कोठाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंजि. अनिल माळगे, विलास कापसे, संभाजी  लोहगावकर, रवींद्र पांडागळे, शुभम घोडगे, गजानन कानडे, नंदा पाटील, सत्यभामा येसगे, शिवराज उमाटे, सिद्धेश्वर स्वामी, नंदू देवणे, सतीश मठपती आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

COMMENTS