Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने शेतकरी चिंतेत

शेतमाल कमी भावात विक्री करण्याची वेळ

यवतमाळ प्रतिनिधी - यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सातत्याने वाढत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे चित्र आहे. त

अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिन दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनातर्फे सुरु : शेखर सिंह
चांदोली धरण आजपासून पर्यटनासाठी बंद
नागवडेची बाजार भावाची घोषणा म्हणजे मृगजळ : केशवराव मगर

यवतमाळ प्रतिनिधी – यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या सातत्याने वाढत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचे चित्र आहे. तूर विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु, ऑनलाइन नोंदणी आर्णी येथे होत नाही. त्यातच शेतकऱ्यांच्या तूर पिकाला कमी भाव मिळत आहे. तूर भावात सातत्याने चढ उतार होत असल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

शेतकऱ्यांच्या समस्या निकाली काढण्यात येत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. त्यांना घोषित करण्यात आलेली नुकसान भरपाई मिळाली नाही. कापूस, सोयाबीन शेतमाल निघून घरात आला. परंतु या मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगायचे तरी कसे असा प्रश्न विचारला जात आहे मात्र या संदर्भात कृषी उत्पन्न बाजार समिती येथील अधिकारी सोबत संपर्क साधला असता अधिकारी कुठलाही प्रकारचा बोलण्यास नाकार देत आहे.

COMMENTS