Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यार्थिनीवर शिक्षकाने केला अत्याचार; जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील धक्कादायक प्रकार

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकानेच इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे लै

रस्ता ओलांडताना मोबाईल वापरण्याची चूक बेतली जीवावर; विजयवाड्यात बसने चिरडल्याचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ आला समोर!
राजस्थानमध्ये चोरट्याने थेट पंतप्रधान मोदींचा मुखौटा घालून चोरले ४ लाख रुपयांचे मोबाईल, घटना CCTV मध्ये कैद!
नांदूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला अटक; सीसीटीव्हीमुळे उघड झाला धक्कादायक प्रकार
Jalgaon Dharangaon Crime : गुरु-शिष्य नात्याला काळिमा; चौथीतील  विद्यार्थिनीसोबत शिक्षकाकडूनच संतापजनक कृत्य, आईच्या तक्रारीवरून पोक्सो  अंतर्गत ...

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकानेच इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालक आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणी आरोपी शिक्षक नंदलाल नारायण मराठे याच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते आणि स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेत आहे. या नराधम शिक्षकाच्या कृत्यामुळे शैक्षणिक वर्तुळातूनही तीव्र निषेध व्यक्त होत असून, पोलिसांनी याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

COMMENTS