नगरकरांना दिलासा…पाणीपुरवठा वाढणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरकरांना दिलासा…पाणीपुरवठा वाढणार

नवीन 600 अश्‍वशक्तीच्या वीज मोटारीने पाणी उपसा होणार

अहमदनगर/प्रतिनिधी : मागील 8 ते 10 दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नगरकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मुळा धरणातून उपसा केलेले पाणी विळद जलशु

कोपरगाव-शिर्डीत एस.टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले (Video)
बँक बचाव समितीची विश्‍वासार्हता धोक्यात?
महिलेची छेड काढणार्‍यास सक्तमजुरी व दंडाची शिक्षा

अहमदनगर/प्रतिनिधी : मागील 8 ते 10 दिवसांपासून पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नगरकरांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मुळा धरणातून उपसा केलेले पाणी विळद जलशुद्धीकरण केंद्रातून नगरकडे उपसा करून पाठवण्यासाठी विळद पंप हाऊस येथे नवीन 600 अश्‍वशक्तीची मोटार बसवण्यात आली असून, येत्या एक-दोन दिवसात ती कार्यरत झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा वाढेल, असा विश्‍वास महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील पाणी पुरवठयाचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे यांनी दिनांक 8 एप्रिलला बैठक घेवून तसेच येत्या 8 दिवसामध्ये पाणी प्रश्‍न सुटावा यासाठी विळद पंपिंग स्टेशन येथे मंगळवारी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी शिवसेना शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक श्याम नळकांडे, संतोष गेनाप्पा, जलअभियंता परिमल निकम, अभियंता ढगे उपस्थित होते. शहराचा व उपनगराचा पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी विळद पंप हाऊस येथे एक नवीन 600 एचपी (अश्‍वशक्ती) मोटार बसविण्यात आली असून, यामुळे शहराचे पाणी वाढण्यास मदत होईल, असा विश्‍वास यावेळी महापौर शेंडगे यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, सध्या उन्हाळा सुरु आहे व गेल्या अनेक महिन्यापासून शहरातील व उपनगरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून तो सुरळीत होण्यासाठी मनपाचे पदाधिकारी, अधिकारी व जल अभियंता निकम यांच्यासमेवत वारंवार बैठक घेवून वसंत टेकडी येथील जलकुंभामध्ये पाणी वाढवून मिळण्यासाठी 1 नवीन 600 एचपीची मोटार बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या सूचनेप्रमाणे 12 एप्रिल रोजी विळद पंप हाऊस येथे पाचवी मोटर बसविण्यात आली. या नवीन बसविलेल्या पंपामुळे पाणी वाढणार आहे व त्यामुळे शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यास मदत होणार आहे. पाचवी मोटर बसविताना तांत्रिक बाबी तपासून व राहिलेल्या त्रुटींची पूर्तता करुन मोटर चालू करण्यात आली आहे. त्यामुळे वसंत टेकडी येथील पाण्याच्या टाकीची पाणी लेव्हल वाढण्यास मदत होणार आहे. विळद ते वसंत टेकडी ही लाईन जुनी झालेली आहे त्यामुळे पाणी पुरवठा करताना जलदाब व जलवाहिनी यांची तपासणी करुन वसंत टेकडी येथील जलकुंभामध्ये पाणी पुरवठा होतो. त्यामुळे या तांत्रिक बाबींचा विचार करून शहरासाठीचा पाणीपुरवठा वाढवला जाणार आहे व त्याचे सगळीकडे प्राधान्याने वितरण केले जाणार आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

COMMENTS