Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदींना नोटीस

नवी दिल्ली/प्रतिनिधी : काँगे्रस नेते राहुल गांधीच्या मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावली आहे.

बेलापूरच्या उपसरपंचपदी मुश्ताक शेख
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात तारू आणि पारस या दोन वाघांची झुंज 
जिल्हा परिषदेत दिव्यांग कर्मचारी, अधिकारी यांच्या समस्यांविषयी बैठक संपन्न

नवी दिल्ली/प्रतिनिधी : काँगे्रस नेते राहुल गांधीच्या मानहानी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकार आणि पूर्णेश मोदी यांना नोटीस बजावली आहे. या प्रकरणावर पुढील सुनावणी आता 4 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे.
मानहानीच्या प्रकरणात सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत त्यांची खासदारकी रद्द केली होती. तर गुजरात उच्च न्यायालयाने सुरत कोर्टाचा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यावर आता सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांना दिलासा मिळाला असल्याचे म्हटले जात आहे. नोटीस बाजवण्यच्या मुद्द्यावर पूर्णेश मोदी यांचे वकील महेश जेठमलानी यांनी यावर कोणताही आक्षेप घेतला नाही. तसेच राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील यासाठी सहमती दर्शवली. दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवल्यानंतर न्यायमूर्ती गवई यांनी या प्रकरणात पूर्णेश मोदी आणि गुजरात सरकारला औपचारिक नोटीस बजावली. दरम्यान पूर्णेश मोदी यांचे वकील महेश जेठमलानी यांनी जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मागितली, जी गवई यांच्या खंडपीठाने मान्य केली आहे. तसेच 10 दिवसांत जबाब देऊ अशी ग्वाही जेठमलानी यांनी दिली आहे.

COMMENTS