नांदेड : अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण ही भारतीय जनता पक्षाची खेळी असून, या मुद्द्यावरून मातंग समाजाला दुश्मन कसे मानता येईल, असा सवाल ब

नांदेड : अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण ही भारतीय जनता पक्षाची खेळी असून, या मुद्द्यावरून मातंग समाजाला दुश्मन कसे मानता येईल, असा सवाल बहुजन समाज पक्षाचे मराठवाडा झोन प्रभारी मनिषभाऊ कावळे यांनी केला.
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात हदगाव येथे आयोजित महामोर्चाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भिक्खू पय्याबोधी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून अनुसूचित जातीतील समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कावळे यांनी केला. समाजाचे विघटन होऊ नये, यासाठी सर्वांनी एकजुटीने भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. बहुजन समाजाची सत्ता प्रस्थापित करणे हे आपले ध्येय असून, समाजातील फूट पाडणार्या शक्तींविरोधात एकत्रितपणे लढण्याचे आवाहनही त्यांनी केले.

COMMENTS