बीड वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे आणि अनावश्यक खर्च करणे नव्हे, तर समाजातील वंचितांच्या चेहर्यावर आनंद फुलवण्याची संधी असते, याचा प्रत्यय युवा प

बीड वाढदिवस म्हणजे केवळ केक कापणे आणि अनावश्यक खर्च करणे नव्हे, तर समाजातील वंचितांच्या चेहर्यावर आनंद फुलवण्याची संधी असते, याचा प्रत्यय युवा पत्रकार तथा दैनिक बीड वास्तवचे उपसंपादक अमोल जाधव यांनी पुन्हा एकदा दिला. बीड तालुक्यातील ढेकणमोह येथील वंचितांच्या हक्काचे घर म्हणून ओळखल्या जाणार्या पसायदान सेवा प्रकल्पात अनाथ मुलांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला.
यावेळी प्रकल्पातील अनाथ मुलांना शालेय साहित्य तसेच फळांचे वाटप करण्यात आले. मुलांसोबत आनंदाचे क्षण अनुभवत वाढदिवस साजरा करताना उपस्थितांनाही समाजाप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. यावेळी बोलताना अमोल जाधव म्हणाले, व्यर्थ खर्च न करता अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा केल्याने मनाला खर्या अर्थाने समाधान मिळते. गेल्या तीन-चार वर्षांपासून मी याच ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहे. या निरागस मुलांचे आशीर्वाद माझ्या आयुष्यात कायम लाभावेत आणि त्यांच्या सेवेसाठी अधिकाधिक काम करण्याची संधी मिळावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तसेच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणार्या सर्व अनाथ मुलांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी अमोल जाधव यांचे बंधू मसू भाऊ जाधव यांनीही उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, या अनाथ मुलांच्या चेहर्यावर आनंद पाहणे हीच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. दरवर्षी या मुलांना शक्य ती मदत करण्याचा आमचा संकल्प कायम राहील. या प्रसंगी मसू भाऊ जाधव, अमित ठोकळ, अजय जाधव, तेजस जाधव, अनिल लांडगे, सचिन कानडे, रोशन कानडे, गणेश कानडे, आदित्य जाधव, रोहन जाधव, ऋषिकेश मुळे तसेच पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक दराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अनाथ मुलांच्या आनंदी चेहर्यांनी आणि त्यांच्या शुभेच्छांनी भारावून गेलेला हा वाढदिवस उपस्थितांच्या मनात कायमची आठवण बनून राहिला. समाजात वाढदिवस साजरा करण्याची सकारात्मक आणि सेवाभावी परंपरा रुजविणारा हा उपक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

COMMENTS