Homeताज्या बातम्या

कंत्राटी कर्मचाऱ्याच्या हत्येने अहिल्यानगर हादरले; मुकुंदनगर परिसरातील घटनेनंतर चार आरोपींना अटक

अहिल्यानगर : शहरात एका युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी

ओबीसीची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे – प्रा. सुशीलाताई मोराळे
NEET पेपरफुटी आंदोलन हिंसाचार प्रकरण: तेज प्रताप यादव यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिक्षण विभागात ’दहशतशाही’चा आरोप; शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार
स्वत:च्या बचावासाठी पोलिसांनीच केला ठाण्याचा दरवाजा बंद... Ahilyanagar  Marathi News | The police closed the door of the police station for their  own protection ... | Latest Ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर : शहरात एका युवकाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली असून शहरात खळबळ उडाली आहे. महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला. शुक्रवारी संध्याकाळी मुकुंदनगर दर्गा दायरा परिसरात कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी हे पोलचे काम करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मुकुंदनगर परिसरातील कबरस्तानमधील विद्युत पोलचे काम सुरू असताना ही घटना घडली होती. तर, हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले होते. दरम्यान, गंभीर जखमी धीरज परदेशी याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

कंत्राटी कर्मचारी असलेल्या धीरजवर नेमकं हल्ला का झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. या हल्ल्याच्या घटनेनंतर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी काल रात्री फरार मुख्य चार आरोपी युनूस शेख, मेहराज सय्यद, सिराज सय्यद आणि मुस्तकीम सय्यद यांना अटक केली आहे. तर धीरज परदेशी याच्यावर झालेला हल्ला हा कोणत्या कारणाने झाला होता, त्याचे नेमकं कारण अद्याप अस्पष्टचं आहे. मात्र, तो हिंदुत्ववादी होता म्हणून त्याला मारण्यात आल्याचा आरोप धीरजच्या पत्नीने केला आहे. तर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, माझ्या पतीला ज्या कबरस्थानमध्ये मारहाण झाली, त्या कबरस्थानमध्ये त्यांचा अंतविधी करावा अशी मागणीही मयत धीरज परदेशीच्या पत्नीने रडत रडत केली. या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली जात आहे.

COMMENTS