नांदेड : बोरगाव नगरीचे भूमिपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज गोविंदराव तेलंगे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत
नांदेड : बोरगाव नगरीचे भूमिपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज गोविंदराव तेलंगे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या यशामुळे बोरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, परिसरातील युवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
विविध अडचणी व अपयशांवर मात करत सुरज तेलंगे यांनी जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर वर्दीचे स्वप्न साकार केले. त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत हा सत्कार करण्यात आला. यावेळी बी. वाय. चव्हाण, भास्करदादा पवार, भीमराव शिंदे आणि सरपंच हनुमंत पाटील खेडकरवाडीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सुरज तेलंगे यांच्या यशाचे कौतुक करून पुढील सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS