Homeताज्या बातम्या

धानोर्‍याचे लोकनेते शेषराव उर्फ चैनू पाटील यांचे निधन

अंबाजोगाई : धानोरा (बु.), ता. अंबाजोगाई येथील ज्येष्ठ नेते, सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक आणि पंचक्रोशीत आपल्या निर्भीड व्यक्तिमत्त्वासाठी परिचित

टीईटी प्रश्नपत्रिका फुटीचा मुख्य सूत्रधार बिहारमधून अटकेत; भिवंडी पोलिसांची मोठी कारवाई
खा. अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा; काँग्रेसचे वर्चस्व संपुष्टात!
शिक्षण विभागात ’दहशतशाही’चा आरोप; शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांच्याविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार

अंबाजोगाई : धानोरा (बु.), ता. अंबाजोगाई येथील ज्येष्ठ नेते, सहकार क्षेत्रातील मार्गदर्शक आणि पंचक्रोशीत आपल्या निर्भीड व्यक्तिमत्त्वासाठी परिचित असलेले शेषराव उर्फ चैनू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने अंबाजोगाई तालुक्यासह धानोरा व पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

शेषराव पाटील यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय व सामाजिक कारकीर्दीत धानोरा ग्रामपंचायतीचे तब्बल २५ वर्षे सरपंचपद भूषविले. तसेच ५० वर्षे सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून काम पाहत त्यांनी सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले. अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्यांनी २० वर्षे संचालक म्हणून काम केले. तसेच खरेदी-विक्री संघाचे ३५ वर्षे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. तालुक्यातील सहकार व राजकारणाच्या क्षेत्रात त्यांचा मोठा दबदबा होता.

तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते आनंद बापू चव्हाण यांचे विश्वासू सहकारी म्हणून शेषराव पाटील यांनी आयुष्यभर कार्य केले. शेतकरी, सहकार आणि ग्रामीण विकासाच्या प्रश्नांशी त्यांची कायमच नाळ जोडलेली होती. त्यांच्या निर्भीड स्वभावामुळे ते ‘चैनू पाटील’ या नावाने धानोरा परिसरासह संपूर्ण पंचक्रोशीत परिचित होते. दीर्घकाळ ग्रामपंचायत, सहकारी संस्था, बाजार समिती तसेच खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने अंबाजोगाई तालुक्याच्या सहकार क्षेत्रातील एक ज्येष्ठ व अनुभवी नेतृत्व हरपले असून मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, पाच मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच धानोरा तसेच अंबाजोगाई तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, सहकारी, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला. निर्भीड नेतृत्व, प्रदीर्घ सहकार सेवा आणि जनसामान्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळे शेषराव उर्फ चैनू पाटील यांच्या कार्याची आठवण कायम स्मरणात राहील.

COMMENTS