Homeताज्या बातम्या

पिंपळनेर परिसरात पावसाळी आजारांचा वाढतोय ‘ताप’; मलेरिया, सर्दी-खोकल्याचे रुग्ण दुपटीने वाढले

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पावसाळी आजारांनी चांगलेच ठाण मांडले आहे. गेल्या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट

गजानन विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; विविध मान्यवरांची उपस्थिती
कोपरगाव-निफाड परिसरातील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीला मंजुरी; आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश, ७.२९ कोटींचा निधी मंजूर
सत्तेत असलात तरी प्रशासनाविरोधात आंदोलन करा; सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी, डॉ. सुजय विखेंचा आ. लंघे यांना सल्ला
उरण परिसरात पावसाळी आजारांचा 'ताप'; डेंग्यू, मलेरिया रुग्णसंख्येत वाढ

पिंपळनेर : बीड तालुक्यातील पिंपळनेरसह परिसरात पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पावसाळी आजारांनी चांगलेच ठाण मांडले आहे. गेल्या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत या वर्षी मलेरिया, सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखीचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत.

गावागावातील अनेक रुग्ण उपचारासाठी खाजगी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पिंपळनेर परिसरात पावसाळी आजारांचा ताप चांगलाच वाढला आहे. परिसरात सातत्याने होत असलेला पाऊस, ढगाळ वातावरण आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

नागरिकांमध्ये विविध आजारांची लक्षणे दिसून येत असतानाही, स्थानिक ग्रामपंचायत आणि शासकीय वैद्यकीय अधिकारी मात्र नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाहीत, असा संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS