नांदेड : माँ तुळजा भवानी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेडच्या वतीने सलग नवव्या वर्षी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा सोमवा
नांदेड : माँ तुळजा भवानी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, नांदेडच्या वतीने सलग नवव्या वर्षी भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा सोमवार, दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता श्रीक्षेत्र हनुमानगड येथून सुरू होऊन श्रीक्षेत्र काळेश्वर मंदिर, विष्णुपुरी येथे पोहोचणार आहे.
श्रावण महिन्यातील पवित्र तिसऱ्या सोमवारी आयोजित या भव्य कावड यात्रेमध्ये सर्व शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे नम्र आवाहन आयोजक रविसिंह चौहान, संतोष औंढेकर, माधवसिंह ठाकूर, सुनील डोईजड, ओमसिंह परमार, संतोष शिंदे, विनोद देशमुख व साई परिहार यांनी केले आहे.

COMMENTS