Oplus_131072 बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृक्ष लागवडी चे विशेष उद्दिष्ट्ये निश्चित केले असून मोठ्या प्रमाणावर जिल्हा भर वृक्ष लागवडीचे आयोजन,संव

बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने वृक्ष लागवडी चे विशेष उद्दिष्ट्ये निश्चित केले असून मोठ्या प्रमाणावर जिल्हा भर वृक्ष लागवडीचे आयोजन,संवर्धन करण्याचे ठरवले असून बीड जिल्ह्यातील सजग नागरिकांनी आपले कर्तव्य समजून उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन राहुल मोरे यांनी केले आहे.
यावर्षी जाणत्या लोकांसह आपण ही असह्य असा मागील कधीही न जाणवलेला उन्हाळा सोसला हे आत्ताच गांभीर्याने घेत वेळीच रोखणे गरजेचे असून येणार्या पिढीसाठी धोकादायक आहे, म्हणून यावर्षी पावसाळ्याच्या दृष्टीने लागवड करण्यात येणार्या वृक्ष लागवडीत लहानांपासून थोरामोठ्यांनी आपली जबाबदारी समजून घेत येणारा काळ सुखकर करण्यासाठी वृक्ष लागवड करून ते जतन संवर्धन करून आपले कर्तव्य पार पाडावे व प्रशासनाला सहकार्य करावे तरच निसर्गचक्र टिकेल हे निश्चित आहे. या वर्षापासून निसर्गा विषयी दूरदृष्टी ठेवत आपले वनक्षेत्र वाढविण्यासाठी 300 कोटी वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवत प्रत्येक जिल्ह्यात वृक्षारोपण अभियान मोठ्या प्रमाणात प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. हे महत्त्वकांक्षी अभियान यशस्वीतेसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून ’एक शाळा,एक विद्यार्थी, एक झाड उपक्रम प्रभावीपणे मोठ्या प्रमाणावर राबविणार असून यावेळी केवळ वृक्ष लागवडच नव्हे, तर लागवड केलेल्या वृक्षांचे पुढील 10 वर्षे जतन आणि संवर्धन करण्यावरही भर देण्यात येणार असुन या उपक्रमाला सर्वांची प्रामाणिक साथ मिळणे आता आवश्यक आहे. वृक्षाचे वेळीच महत्त्व लक्षात घेत,आपले वर्तमान, येणारे भविष्य, आणि पुढील पिढीचे आयुष्य निसर्गावर अवलंबून असून निसर्ग जपला तर तो आपल्याला जपेल हा गांभीर्यपूर्वक विचार करून सर्वांनी सहकार्य करण्याची गरजेची आहे. मानव कितीही प्रगतीच्या शिखरावर असला तरी आपली पर्यावरणीय साखळी जपणे ही काळाची गरज असून या राबवल्या जाणार्या वृक्ष लागवडी मध्ये वृक्षप्रेमी,स्वयंसेवी संस्था,सामाजिक कार्यकर्ते सामाजिक संस्था, सामाजिक संघटना सह विविध पदाधिकारी यासह आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेने प्रत्येकाने आपले योगदान देत सर्वांनी जबाबदारीने कार्य करत एक वृक्ष लागवड करून संवर्धन करावे असेही आव्हान यावेळी त्यांनी केली आहे.

COMMENTS