बीड : अल्पसंख्यांक समाजाच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीने आपल्या आंदोलनाची दिशा अधिक

बीड : अल्पसंख्यांक समाजाच्या संरक्षणासाठी प्रभावी कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीने आपल्या आंदोलनाची दिशा अधिक तीव्र केली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील जालना रोड येथे 4 मे रोजी सायं.07:00 वाजता समितीची महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात पार पडली.
या बैठकीत समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला असून, लवकरच तालुका निहाय समित्यांची बांधणी करून आंदोलन अधिक व्यापक करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. अल्पसंख्यांक संरक्षण कायदा लागू करण्यासाठी संघटित व प्रभावी लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. गेल्या काही वर्षांत अल्पसंख्यांक समाजावर होणार्या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले. हेट स्पीच, दंगली आणि मॉब लिंचिंगसारख्या गंभीर घटनांमुळे समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अशा घटनांवर कठोर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने अल्पसंख्यांक संरक्षण कायदा लागू करावा, अशी मागणी बैठकीत ठामपणे मांडण्यात आली. दरम्यान, या मागणीसाठी 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषणही करण्यात आले होते. पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी संघटनात्मक बळकटीवर भर देत तालुका स्तरावर समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. समितीच्या वतीने लवकरच मोठ्या प्रमाणावर जनजागृती आणि आंदोलनाची पुढील दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या बैठकीत अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समितीचे मुजतबा खान सर,प्रा.इलियास इनामदार, प्रा.शेख अमर, एडवोकेट जेबा शेख, शेख मुसा सर,एड. मोमीन अखिल, मुशीर इनामदार,शेख अखिल अण्णा,शेख मैनूद्दीन,पत्रकार पठाण अमरजान,सलीम खान, पाले खान,डॉ.मोसीन शेख,शेख ऐहेतेशाम,सय्यद नबिलउज्जमा, एड.जावेद मणियार,शामिर खान,आबेद कादरी,शेख खदीर,शेख नदीम,शेख जावेद सह इतर सामाजिक व राजकीय प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS