पुणे जिल्ह्यात होळी, धुळवड साजरी करण्यावर बंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यात होळी, धुळवड साजरी करण्यावर बंदी

जिल्ह्यामध्ये होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी घालण्यात आली आहे.

बिहारमध्ये मोठा रेल्वे अपघात
धर्म सत्कर्माने व्यक्त व्हावा !
महागाईचा तडका, लसूण 600 रुपये किलोच्या घरात

पुणे/प्रतिनिधीः जिल्ह्यामध्ये होळी आणि धुळवड साजरी करायला बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. या आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. या  पार्श्‍वभूमीवर आता प्रशानाकडून काही पावले उचलली जात आहेत. याचाच एक भाग म्हणून आता होळी आणि धुळवड हे दोन सण साजरे करायला बंदी घालण्यात आली आहे. 

आज याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात आले आहेत. या आदेशानुसार कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने खबरदारीची उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी पुणे जिल्हयाचे ग्रामीण कार्यक्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसॉर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खाजगी मोकळया जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळया जागा येथे 28 मार्च 2021 रोजी साजरा होणारा होळी उत्सव तसेच 29 मार्च 2021 रोजी साजरा होणारा धुलीवंदन व रंगपंचमी उत्सव साजरे करण्यास मनाई करण्यात येत असल्याचे आदेश दिले आहेत. या मनाई आदेशाचे पालन करून नागरिकांनी जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे तसेच या आदेशामधील कोणत्याही तरतुदीचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा- 2005 व कायदयातील इतर तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही या आदेशात म्हटले आहे

COMMENTS