Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सगरोळी मार्गावरील विस्कळीत बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणीबिलोली-देगलूर व नांदेड-सगरोळी बसफेर्‍या तातडीने सुरू करण्यासाठी नागरिकांचे निवेदन

बिलोली : सगरोळी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन बिलोली-सगरोळी मार्गे देगलूर तसेच नांद

‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!
डिझेलसाठी ‘सातबारा’ मागणाऱ्या पंप चालकांवर तातडीने कारवाई करा; डॉ. अजित नवलेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
केज पंचायत समिती परिसरातील बॅनर अतिक्रमण हटवण्याची; मागणी; 8 दिवसांचा अल्टिमेटम, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

बिलोली : सगरोळी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन बिलोली-सगरोळी मार्गे देगलूर तसेच नांदेड ते सगरोळी मुक्कामी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत ग्रामपंचायतींच्या ठरावांसह निवेदन बिलोली आगार प्रमुखांकडे सादर करण्यात आले.
बिलोली व देगलूर हे तेलंगणा आणि कर्नाटक सीमेलगतचे महत्त्वाचे तालुके असून नागरिकांना शासकीय कामकाज, शिक्षण, आरोग्यसेवा तसेच दैनंदिन व्यवहारांसाठी नियमित प्रवास करावा लागतो. याशिवाय सीमाभागातील नातेसंबंध, व्यापारी व्यवहार आणि सामाजिक संपर्कामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची सतत वर्दळ असते. नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीनुसार, तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस बोधन-सगरोळी मार्गे देगलूरपर्यंत नियमित धावत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मात्र गेल्या जवळपास वर्षभरापासून राष्ट्रीय महामार्ग क्र. 63 वरून गायब झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास योजना तसेच महिला व दिव्यांगांसाठीच्या सवलतींचा लाभही बससेवा बंद असल्याने मिळत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. सगरोळी व खतगाव येथे मोठी शैक्षणिक संकुले असल्याने विद्यार्थ्यांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खासगी वाहनांचा वाढता खर्च आणि सुरक्षित प्रवासाचा प्रश्न यामुळे पालकांमध्येही चिंता वाढली आहे. त्यामुळे खतगाव, केसराळी, रामपूर थडी, हिप्परगा थडी, शिंपाळा आदी गावांतील नागरिकांनी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून बिलोली-सगरोळी-खतगाव मार्गे देगलूर बसफेरी तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. तसेच नांदेड-सगरोळी मुक्कामी बसही खतगाव मार्गे पूर्ववत नियमित सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  नागरिकांच्या मते, ही बससेवा सुरू झाल्यास रुग्णांना नांदेड येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणे सोयीचे होईल. तसेच जिल्हास्तरीय प्रशासकीय कामकाज, शिक्षण, व्यवसाय आणि इतर आवश्यक प्रवासासाठीही मोठा दिलासा मिळणार आहे. या मागणीसंदर्भातील निवेदन आणि ग्रामपंचायतींच्या ठरावांच्या प्रती दि. 7 मे रोजी सामाजिक कार्यकर्ते राजू पाटील शिंपाळकर, विठ्ठलराव पा. काळे केसराळीकर आणि नागनाथ भुसावळे आदमपूरकर यांनी बिलोली आगार प्रमुख नर्सिंग निम्मनवाड यांना सुपूर्द केल्या.

COMMENTS