Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अमृतसरमध्ये लष्करी तळांजवळ दोन भीषण स्फोट; फारुख अब्दुल्लां यांचे संतापजनक विधान

https://www.youtube.com/watch?v=vqpkuXHpYMU अमृतसर/जालंधर (६ मे २०२६): पंजाबमध्ये मंगळवारच्या (५ मे २०२६) रात्री अवघ्या काही तासांच्या अंतरा

“यदा यदा ही धर्मस्य”..सरकार बलात्कारांच्या घटनांवर सरकार कठोर भूमिका घेणार आहे का नाही?
कोल्हापूर हादरले! सुर्वे नगरात बंद घरात जिलेटिनचा भीषण स्फोट; घर उडवण्याचा कट? आजूबाजूच्या घरांचेही मोठे नुकसान!
कल्याण-टिटवाळ्यात सहा कोटींचे अमली पदार्थ जप्त

अमृतसर/जालंधर (६ मे २०२६): पंजाबमध्ये मंगळवारच्या (५ मे २०२६) रात्री अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. अमृतसरमधील खासा येथील लष्करी तळाजवळ आणि जालंधरमधील बीएसएफ (BSF) मुख्यालयाजवळ हे स्फोट झाले.

रात्री सुमारे १०:५० च्या सुमारास खासा लष्करी छावणीच्या भिंतीबाहेर एक स्फोटक वस्तू फेकण्यात आली, ज्यामुळे मोठा स्फोट झाला. यापूर्वी जालंधरमधील बीएसएफ (BSF) फ्रंटियर मुख्यालयाजवळ गजबजलेल्या बीएसएफ चौकात उभ्या असलेल्या स्कूटरमध्ये स्फोट झाला.

या स्फोटांवर प्रतिक्रिया देताना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी अत्यंत वादग्रस्त विधान केले आहे. “हिंदुस्थानात स्फोट होतच असतात, यात नवीन काय आहे?” असे विधान त्यांनी केल्याचे वृत्त आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS