Homeताज्या बातम्या

वाहतूक शाखेच्या दक्षतेमुळे चोरीची बुलेट सापडली; उरळी कांचन पोलिसांकडे मुद्देमाल सुपूर्द

बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीची रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल हस्तगत करण्यात यश आले असून, संबंधित वाहन पुढील कायदेशीर कार्यवाहीसा

दिल्लीत कारमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू
छ.संभाजीनगरमध्ये तरूणीची भरदिवसा हत्या
देशद्रोह प्रकरणात रामपालला जामीन



बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या सतर्कतेमुळे चोरीची रॉयल एनफिल्ड (बुलेट) मोटारसायकल हस्तगत करण्यात यश आले असून, संबंधित वाहन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी उरळी कांचन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमुळे वाहतूक शाखेच्या दक्षतेचे आणि कर्तव्यदक्षतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथक शहरात नियमित गस्त घालत असताना त्यांना एक संशयास्पद बेवारस रॉयल एनफिल्ड मोटारसायकल आढळून आली. वाहनाची बारकाईने तपासणी व तांत्रिक पडताळणी करण्यात आली. त्यावेळी सदर मोटारसायकल चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. पुढील चौकशीत ही मोटारसायकल पुणे जिल्ह्यातील उरळी कांचन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे उघड झाले. या संदर्भात गुन्हा रजिस्टर क्रमांक 402/2024 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 3(5) व 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास उरळी कांचन पोलीस ठाण्याकडून सुरू आहे. चोरीचा मुद्देमाल सापडल्यानंतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून बीड जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी मोटारसायकल उरळी कांचन पोलीस ठाण्याचे तपास अंमलदार पोलीस हवालदार सचिन मोरे यांच्याकडे मुद्देमाल हस्तांतरण ताबा पावती व सुपूर्दनाम्यासह रीतसर स्वाधीन केली. ही कारवाई बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, प्रभारी पोलीस अधीक्षक चेतना तिडके तसेच अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील व त्यांच्या पथकाने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीचे पोलीस विभागात कौतुक होत आहे. चोरीचे वाहन शोधून ते संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्याच्या या यशस्वी कारवाईमुळे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि चोरीचा मुद्देमाल परत मिळवून देण्यासाठी पोलीस यंत्रणा किती सतर्कतेने काम करत आहे, याची प्रचिती पुन्हा एकदा नागरिकांना आली आहे.

COMMENTS