Homeताज्या बातम्यादेश

भारतात दरवर्षी वायू प्रदुषणामुळे 21 लाख लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली ः राजधानी दिल्ली, मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता चांगलीच खालावली होती. त्यामुळे अनेकांच्या आ

इस्त्राइल – पॅलिस्टिन संघर्ष आणि भारत! 
आधी चिमुरडीवर बलात्कार केला, मग मारहाण, धक्कादायक घटना | DAINIK LOKMNTHAN
अतिवृष्टीच्या अनुदान वाटपात भेदभाव नको ः शिंदे

नवी दिल्ली ः राजधानी दिल्ली, मुंबईसह देशभरातील अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवेची गुणवत्ता चांगलीच खालावली होती. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर देखील परिणाम झाला होता. मात्र भारतासारख्या देशात दरवर्षी वायू प्रदूषणामुळे जवळपास 21 लाख लोकांचा मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. एका संशोधन अहवालातून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
गेल्या काही दिवसांपासूनराजधानी दिल्लीत वायूप्रदुषामुळे नागरिकांना श्‍वास घेणेही कठीण झाले आहे. मुंबईतही दिवसेंदिवस हवेची गुणवत्ता बिघडत चालली आहे. वायू प्रदुषण रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पाऊले उचलण्यात येत आहे. अशातच एक खळबळजनक माहिती समोर आली आहे.  वायू प्रदुषणामुळे दरवर्षी भारतात जवळपास 21 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. एका संशोधन अहवालातून ही धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. यामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या चिंतेत वाढ झाली असून हवेचे प्रदूषण नेमके कसे कमी करता येईल, यावर संशोधनाची गरज आहे. वायू प्रदूषणाच्या अभ्यासानुसार, देशात दरवर्षी प्रदूषणामुळे 2.18 मिलियन म्हणजेच 21 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. वायू प्रदुषणामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण चीनमध्ये सर्वाधिक आहे. चीननंतर भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. या अभ्यासासाठी नवीन मॉडेल राबविण्यात आले होते. प्रदूषणाच्या या कारणांमध्ये जवळपास सर्व बाह्य स्रोतांचा समावेश होता. वायू प्रदूषणामुळे होणार्‍या मृत्युमध्ये 52 टक्के मृत्यू हृदयविकाराचे आजार, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज आणि मधुमेह यासारख्या सामान्य परिस्थितींशी संबंधित आहेत. याशिवाय 20 टक्के मृत्यू प्रकरणे उच्च रक्तदाब, अल्झायमर आणि पार्किन्सन रोग यांसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह विकारांशी संबंधित आहेत. दरम्यान, उद्योग, वीज निर्मिती आणि वाहतुकीमध्ये जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे होणार्‍या वायू प्रदूषणामुळे जगभरात दरवर्षी 51 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू होतात, असेही अभ्यासातून समोर आले आहे.

COMMENTS