Homeताज्या बातम्या

केतन अग्रवाल हत्याप्रकरणात बीड कनेक्शनतरुणाची चौकशी, आरोपींच्या ‘पॉलीग्राफ टेस्ट’ची मागणी

पुणे : लोहगड परिसरात उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले असून, या तरुणाला हत्येच्या कटा

हिमाचलमध्ये अनिवासी भारतीय दाम्पत्याला मारहाण
अमोल मिटकरी यांची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री यांना पत्र.
लोकप्रिय दिग्दर्शक संगीत सिवन यांचं निधन
केतन खून प्रकरण Latest News in Marathi, ketan agarwal pune murder च्या ताज्या बातम्या - दिव्य मराठी


पुणे : लोहगड परिसरात उद्योजक केतन अग्रवाल यांच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या तपासात आणखी एका तरुणाचे नाव समोर आले असून, या तरुणाला हत्येच्या कटाची पूर्वकल्पना असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. या पार्श्‍वभूमीवर त्याची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची ‘पॉलीग्राफ टेस्ट’ करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.
तपासातील माहितीनुसार, संबंधित तरुण हा बीड जिल्ह्यातील असून सध्या पुण्यातील बालेवाडी परिसरात एका खासगी संस्थेत कार्यरत आहे. तो आरोपी चेतन चौधरीचा जुना परिचित आणि वर्गमित्र असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक चौकशीत, मे महिन्याच्या अखेरीपासून त्याचा चेतनशी सातत्याने संपर्क होता, अशी माहिती समोर आली आहे. हत्येच्या कथित कटाविषयी त्याच्याशी चर्चा झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, घटनादिवशी लोहगडावर येण्याचे निमंत्रण त्याला देण्यात आले होते. मात्र, त्याने त्यास नकार देत असे कृत्य टाळण्याचा सल्ला दिल्याचे समजते. तपास यंत्रणा दूरध्वनी नोंदी, संदेशवहन आणि इतर तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करत आहेत. या तरुणाची भूमिका नेमकी काय होती, याचा उलगडा करण्यासाठी चौकशी अधिक तीव्र करण्यात आली आहे. घटनेच्या दिवशी परिधान केलेल्या वस्त्रांची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी सिया गोयलला तिच्या निवासस्थानी नेले होते. तेथून काही साहित्य जप्त करण्यात आले असून, ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या वेळी माध्यम प्रतिनिधी उपस्थित असताना सियाने आक्षेपार्ह हातवारे केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारानंतर सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, तिच्या वर्तनावर टीका व्यक्त केली जात आहे.
हत्येपूर्वी सराव केल्याचा संशय
तपासादरम्यान पोलिसांनी सिया गोयलला पुण्यातील एका ठिकाणी नेऊन पाहणी केली. या ठिकाणी मे महिन्यात एखाद्या व्यक्तीला कड्यावरून ढकलण्याचा सराव करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्या वेळी आणखी कोण व्यक्ती उपस्थित होत्या, याची माहिती मिळविण्यासाठी तपास सुरू आहे. आरोपींकडून देण्यात आलेले जबाब आणि उपलब्ध पुरावे यांची सांगड घालण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या ‘पॉलीग्राफ टेस्ट’साठी न्यायालयाची परवानगी मागितली आहे.

COMMENTS