Homeताज्या बातम्या

रस्त्यांवरील बॅनरबाजीला लगाम; नियमभंग केल्यास कारवाईचा इशाराजिल्हा वाहतूक शाखेची युवकांसोबत बैठक; परवानगीशिवाय बॅनर न लावण्याच्या सूचना

बीड ; शहरातील वाढत्या बेकायदेशीर बॅनरबाजीमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह

कॅफेच्या नावाखाली सुरू होते अश्लील चाळेकर्जत पोलिसांची कारवाई, दोन जोडपी ताब्यात
मुंबई विमानतळावरून 5 कोटीचे सोने जप्तराजकीय पदाधिकार्‍यासह पाच जण ताब्यर्चीं
दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचारतक्रारीनंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची मोहीम


बीड ; शहरातील वाढत्या बेकायदेशीर बॅनरबाजीमुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वाहतूक शाखेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंगाने जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी शहरातील विविध सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने बॅनर लावणार्‍या युवकांची बैठक घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
या बैठकीत शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे तसेच विद्युत खांबांवर कोणत्याही प्रकारचे बॅनर, फ्लेक्स किंवा जाहिरातीचे फलक परवानगीशिवाय लावू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. रस्त्यांच्या कडेला आणि चौकांमध्ये लावण्यात येणारे बॅनर वाहनचालकांचे लक्ष विचलित करतात. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढते, असे निरीक्षक पाटील यांनी यावेळी सांगितले. तसेच सार्वजनिक मालमत्तेवर बेकायदेशीररित्या बॅनर लावल्यामुळे सरकारी संपत्तीचे नुकसान होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणतेही जाहिरात फलक, स्वागत बॅनर किंवा फ्लेक्स उभारण्यापूर्वी संबंधित नगर परिषद अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक असल्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. बैठकीदरम्यान युवकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याची ग्वाही दिली. शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतुकीसाठी सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी नियमांचे उल्लंघन करून सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर किंवा जाहिरातीचे फलक लावणार्‍यांवर संबंधित कायद्यांनुसार दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हा वाहतूक शाखेकडून देण्यात आला. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अनधिकृत बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेल्या या मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, यामुळे शहराचे सौंदर्य जपण्यास आणि अपघातांची संख्या कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS