Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उष्णतेमुळे आजारांचा फैलाव; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन-वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बोधनकर

कुंडलवाडी : कुंडलवाडी शहर व परिसरात वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम दिसून येत असून विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या सर्दी, ताप

मुंबईत अन्नातून विषबाधा; चौघांचा मृत्यू
निलंग्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी! ४२ अंशांच्या तडाख्याने शेतातच दुर्दैवी अंत
राज्यासह 13 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; प्रशासन सतर्क, नागरिकांना काळजीचे आवाहन

कुंडलवाडी : कुंडलवाडी शहर व परिसरात वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम दिसून येत असून विविध आजारांच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. सध्या सर्दी, ताप, खोकला तसेच उलट्या-जुलाबाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली असून लहान मुलांमध्ये विषाणूजन्य आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे माजी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बोधनकर यांनी सांगितले.
सकाळी गारवा आणि दुपारी प्रखर उष्णता या बदलत्या हवामानामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. त्यामुळे फ्ल्यू, सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारांचा प्रसार वाढत असून दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. उन्हाळ्यात अस्वच्छ पाणी, थंड पेये आणि बाहेरील खाद्यपदार्थ यामुळे पोटाचे विकार वाढण्याची शक्यता अधिक असते. रस्त्यावर विकल्या जाणार्‍या खाद्यपदार्थांमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि निकृष्ट दर्जाच्या बर्फाचा वापर यामुळे उलट्या-जुलाबाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळते. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरचे ताजे अन्न सेवन करावे आणि बाहेरील पदार्थ टाळावेत, असा सल्ला देण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये फ्ल्यूचे प्रमाण वाढत असल्याने दरवर्षी फ्ल्यू लसीकरण करणे आवश्यक आहे. एकदाच लस घेतल्याने कायम संरक्षण मिळते हा समज चुकीचा असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी
आजाराची लक्षणे दिसल्यास मुलांना शाळेत न पाठवता उपचार करावेत., नियमित हात धुण्याची सवय लावावी व स्वच्छता राखावी., वेळेवर आहार घेऊन पुरेशी झोप घ्यावी., जंक फूड टाळून पौष्टिक आहार घ्यावा., भरपूर पाणी व द्रवपदार्थांचे सेवन करावे., दुपारी 12 ते 4 या वेळेत उन्हात जाणे टाळावे., बाहेर जाताना डोके झाकावे व हलके, सूती कपडे वापरावेत., उकळून थंड केलेले किंवा स्वच्छ पाणीच प्यावे., उघडे खाद्यपदार्थ व कापलेली फळे टाळावीत., लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी.,लक्षणे दिसल्यास अफवांवर विश्वास न ठेवता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य काळजी घेतल्यास उन्हाळ्यातील आजारांपासून सहज बचाव करता येऊ शकतो, असे डॉ. बोधनकर यांनी सांगितले.

COMMENTS