निलंग्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी! ४२ अंशांच्या तडाख्याने शेतातच दुर्दैवी अंत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निलंग्यात उष्माघाताने शेतकऱ्याचा बळी! ४२ अंशांच्या तडाख्याने शेतातच दुर्दैवी अंत

लातूर : लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा आता थेट जीवघेणा ठरू लागला आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेत

उष्णतेमुळे आजारांचा फैलाव; नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन-वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेश बोधनकर
मुंबईत अन्नातून विषबाधा; चौघांचा मृत्यू
राज्यासह 13 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा; प्रशासन सतर्क, नागरिकांना काळजीचे आवाहन
The current image has no alternative text. The file name is: 3-9.jpg

लातूर : लातूर जिल्ह्यात उन्हाचा पारा आता थेट जीवघेणा ठरू लागला आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात काम करत असताना उष्माघाताचा तीव्र झटका बसल्याने एका ६० वर्षीय शेतकऱ्याला आपला प्राण गमवावा लागला आहे.
लक्ष्मण दादाराव भंडारे असे या दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. सोमवारी दुपारी ४२ अंश तापमानात लक्ष्मण शेतात काम करत होते. मात्र, कडाक्याच्या उन्हामुळे ते अचानक जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारासाठी नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. शरीरातील पाण्याची पातळी अत्यंत खालावल्याने हा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
एकीकडे लातूरमध्ये ही घटना घडली असतानाच, दुसरीकडे हवामान विभागाने मोठा इशारा दिला आहे. पुढील ४ ते ५ दिवस उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अकोला आणि वर्ध्यासारख्या शहरांनी तर ४५ अंशांचा उच्चांक गाठला असून दिल्लीतही पारा ४४ अंशांच्या पार जाण्याचा अंदाज आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, एका बाजूला उष्णतेचा तडाखा असतानाच, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारा, वीज आणि गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे. ताशी ३० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून यामुळे उभ्या पिकांचे आणि फळबागांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हवामानातील या टोकाच्या बदलांमुळे नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत काम टाळण्याचे आणि जास्तीत जास्त पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका आता बळीराजाला बसताना दिसत आहे.

COMMENTS