Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पो.नि. मारोती मुंडे पोलीस वर्दीवर असताना काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकरांच्या जयजयकाराच्या घोषणा दिल्यामुळे देगलूरात खळबळ;पोलीस निरीक्षक राजकीय कार्यकर्ते की अधिकारी यावर संदिग्धता

रमेश देवडे : कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार्‍या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍याने सार्वजनिक राजकीय व्यासपीठावर जाऊन एका नेत्याच्या जयजयकाराच्या

जुने विधेयक परत आणा; पाहुया कोण महिला विरोधी; प्रियांका गांधी वाड्रांनी चांगलेच सुनावले
भोंदू बाबा खरात हा फडणवीस सरकारचाच माणूस!
नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली;राणा-वडेट्टीवार वाद चिघळला; आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फैर

रमेश देवडे : कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार्‍या पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍याने सार्वजनिक राजकीय व्यासपीठावर जाऊन एका नेत्याच्या जयजयकाराच्या घोषणा देणे, भविष्यात मंत्री होण्याचे भाकीत करणे, मतदारसंघातील जातीय समीकरणांचा उल्लेख करणे आणि निवडणूक विजयाचा दावा करणे-या प्रकारामुळे देगलूर परिसरात तीव्र चर्चा रंगली आहे. मारोती मुंडे यांनी काँग्रेस नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या 44 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यांमुळे पोलिसांच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देगलूर येथे झालेल्या वाढदिवस सोहळ्यात पोलीस निरीक्षक मारोती मुंडे हे अधिकृत खाकी वर्दीत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी रामदास पाटील सुमठाणकर यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. रामदास पाटील… असे उच्चार करताच उपस्थितांकडून जय हो अशा घोषणा देण्यात आल्या. या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित नागरिकही चक्रावले. इतकेच नव्हे तर, त्यांनी  2029च्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत या जयघोषाचा परिणाम दिसला पाहिजे, असेही वक्तव्य केल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या संदर्भातील अशा सूचक टिप्पणीमुळे एका जबाबदार पोलिस अधिकार्‍याने आपली प्रशासकीय मर्यादा ओलांडल्याची चर्चा सुरू झाली आहे. कार्यक्रमात बोलताना मुंडे यांनी रामदास पाटील यांना ते निश्चितच राज्याचे मंत्री होतील असा आत्मविश्वास व्यक्त केला. पुढे त्यांनी मतदारसंघातील कास्ट पॉप्युलेशनचा फायदा त्यांना होईल, असे विधान केल्याने वातावरण अधिकच तापले. पोलिस अधिकार्‍याने जातीय गणिते आणि राजकीय समीकरणांवर भाष्य करणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यांनी पुढे ते जिथून उभे राहतील तिथून सहज निवडून येतील, त्यांच्या विजयाचा अश्वमेध कोणी रोखू शकणार नाही अशी राजकीय भाषणेही ठोकल्याचे समोर आले आहे. एका राजकीय कार्यकर्त्यालाही लाजवेल अशा शैलीत झालेल्या या भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. याच कार्यक्रमात त्यांनी आपण ज्यांचे मीठ खातो त्यांचे नीट काम करावे असा सल्लाही दिला. या वक्तव्याचा नेमका संदर्भ काय, याबाबतही संभ्रम व्यक्त केला जात आहे. तसेच घरगुती जीवनाविषयीही विनाकारण टिप्पणी करत रामदास पाटील यांनी घरी हजेरी लावावी आणि त्यांच्या पत्नीने रोज हजेरी घ्यावी, असा सल्ला त्यांनी दिला. यामुळे कार्यक्रमाचा विषय वाढदिवसाचा होता की राजकीय प्रचारसभा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कायदा अंमलबजावणी यंत्रणेतील अधिकारी हे सर्व पक्षांपासून समान अंतर राखून काम करतात, अशी लोकशाहीतील अपेक्षा असते. पोलिस अधिकार्‍यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे वेगळे; परंतु उघड राजकीय समर्थन, जयजयकार, निवडणूक भाष्य आणि जातीय समीकरणांवरील टिप्पणी हा अत्यंत गंभीर विषय मानला जात आहे. देगलूर परिसरात या घटनेनंतर खाकी वर्दीवर राजकीय रंग चढला का? अशी चर्चा रंगली आहे. शासकीय सेवकांसाठी आचारसंहिता, सेवा नियम आणि राजकीय तटस्थतेचे निकष स्पष्ट असताना अशा प्रकाराला मोकळीक दिली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दखल घेऊन संबंधित व्हिडिओ, भाषण आणि कार्यक्रमातील उपस्थितीची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. अन्यथा प्रशासनाची तटस्थ प्रतिमा मलिन होण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. खाकी वर्दी ही जनतेच्या विश्वासाचे प्रतीक आहे; ती कोणत्याही पक्षाच्या प्रचारमंचाची सजावट बनू नये, अशी तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. लोकशाही व्यवस्थेत पोलिस दल हे कायद्याचे रक्षक असते, कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते नव्हे. त्यामुळे वर्दीतील अधिकार्‍याने सार्वजनिक मंचावर राजकीय जयघोष करणे, निवडणूक विजयाचे भाकीत करणे आणि विशिष्ट नेत्याच्या समर्थनार्थ बोलणे हा अत्यंत गंभीर प्रकार मानला जातो. अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या मनात पोलिसांच्या निष्पक्षतेबाबत शंका निर्माण होते. उद्या विरोधी विचारांच्या नागरिकांना न्याय मिळेल का, असा प्रश्न उभा राहतो. शासकीय सेवकांनी सेवा नियम, आचारसंहिता आणि मर्यादा पाळल्या नाहीत तर संपूर्ण यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होतो. त्यामुळे अशा प्रकरणांची तातडीने चौकशी होणे आवश्यक आहे. पोलिस अधिकारी समाजासाठी आदर्श शिस्त, संयम आणि जबाबदारीचे प्रतीक मानले जातात. अशा व्यक्तीने राजकीय व्यासपीठावर जातीय समीकरणे, विजयाची भाषा आणि वैयक्तिक निष्ठेचे संकेत देणे समाजासाठी चुकीचा संदेश ठरतो. यामुळे प्रशासनावर राजकीय प्रभाव असल्याची भावना बळावते. तरुण पिढीसमोरही चुकीचे उदाहरण उभे राहते की पदाचा वापर प्रभाव वाढवण्यासाठी करता येतो. राजकारण आणि प्रशासन यांच्यातील आवश्यक अंतर कमी झाले तर कायदा कमकुवत होतो. म्हणून अशा घटनांकडे केवळ वाद म्हणून नव्हे, तर संस्थात्मक शिस्तीच्या कसोटीवर पाहिले गेले पाहिजे.

COMMENTS