Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड महापालिकेतर्फे महात्मा बसवेश्वरांना अभिवादन; जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण

नांदेड : जागतिक लोकशाहीचे जनक, थोर समाजसुधारक आणि क्रांतियोगी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या वतीने

महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद  गायकवाड
किनवटमध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती उत्साहात साजरी;पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे नगराध्यक्षांचे आश्वासन
माहूर शहरातील शासकीय निवासी शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Nanded After the entry of ED in Nanded Municipal Corporation officials fled  to Mumbai | Nanded: नांदेड महापालिकेत ईडीची एन्ट्री झाल्याने अधिकाऱ्यांचा  मुंबईकडे पळ, अधिकारी ...

नांदेड : जागतिक लोकशाहीचे जनक, थोर समाजसुधारक आणि क्रांतियोगी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका यांच्या वतीने कौठा येथील अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम दि. 19 एप्रिल रोजी सकाळी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी कविता  मुळे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच दीपकसिंह रावत आणि विरेंद्रसिंग गाडीवाले यांनीही अभिवादन करून बसवेश्वरांच्या कार्याला आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी 12 व्या शतकात सामाजिक समता, श्रमप्रतिष्ठा, स्त्री-पुरुष समानता आणि लोकशाही मूल्यांचा पाया रचला. अन्याय, अंधश्रद्धा आणि जातिभेदाविरुद्ध त्यांनी उभारलेला संघर्ष आजही प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार समाजाला नवी दिशा देणारे असून आधुनिक काळातही ते तितकेच महत्त्वपूर्ण आहेत. कार्यक्रमास डॉ. अजित गोपछडे, डी. पी. सावंत, अमरनाथ राजूरकर, चैतन्य बापू देशमुख, महेश कनकदंड, किशोर स्वामी, शैलजा स्वामी, संतोष मुळे यांच्यासह अनेक नगरसेवक, अधिकारी, विभागप्रमुख आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS