Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामानवांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानकात ‘अक्षर’ सेवाभावी संस्थेकडून पाणपोईचे लोकार्पणपाच वर्षांची अखंड परंपरा; प्रवाशांची तहान भागवण्यासाठी स्तुत्य उपक्रम

केज: महात्मा जोतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानक येथे ‘अक्षर’ सेवाभावी संस्था व शिक्षक मित्रपरिवार

पाणपोई हे पुण्यकर्म नव्हे तर आरोग्य सुविधा : सावंत
तलाव उशाला कोरड घशाला, आठ महिन्यापासून जलजीवन ठप्प
एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!


केज: महात्मा जोतिराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त केज बसस्थानक येथे ‘अक्षर’ सेवाभावी संस्था व शिक्षक मित्रपरिवाराच्या वतीने ‘थंडगार जार पाणपोई’चे लोकार्पण उत्साहात करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यावर्षीही कायम ठेवण्यात आली असून, प्रवाशांच्या सोयीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे, आगारप्रमुख श्री. चौरे आणि गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी बोलताना पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी उन्हाळ्याच्या तीव्रतेत अशा पाणपोईंचे महत्त्व अधोरेखित केले. प्रवाशांना थंडगार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे ही खर्‍या अर्थाने समाजसेवा आहे, असे त्यांनी सांगितले. तर शिक्षण विस्तार अधिकारी दत्तात्रय चाटे यांनी ग्रामीण भागातून येणार्‍या सर्वसामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असल्याचे नमूद करून ‘अक्षर’ संस्था व शिक्षक मित्रपरिवाराचे कौतुक केले.  या प्रसंगी संजय चवरे, जी. बी. गदळे, आश्रुबा सोनवणे, सर्वज्ञ अकॅडमीचे संचालक दत्तात्रय बांगर, जनार्धन सोनवणे, विवेक ढोकर, बाळासाहेब देशमुख, सतीश देशमुख, गणेश नांदे, बळी जाधव, बाळासाहेब बचुटे, जयदीप देशमुख, चंद्रकांत मोरे, किशोर भालेराव, युवराज हिरवे, चैतन्य तांबवेकर यांसह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विक्रम डोईफोडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्ही. एम. यादव यांनी मानले.

COMMENTS