Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड दक्षिण मतदारसंघात 20 कोटी 70 लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण

नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये आ. आनंदराव बोंढारकर यांच्या निधीतून राबविण्यात आलेल्या सुमारे 20 कोटी 70 लाख रुपयां

आ. बोंढारकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; नांदेड शहर-ग्रामीणमधील 29 हजार शेतकर्‍यांसाठी 24. 50 कोटींचा पिक विमा मंजूर
खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची बैठक
 सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता गलधर यांचा गलथान कारभार पुन्हा उघड; गुरुद्वारा मार्गाचे काम 100 दिवसांपासून ठप्प

नांदेड : नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये आ. आनंदराव बोंढारकर यांच्या निधीतून राबविण्यात आलेल्या सुमारे 20 कोटी 70 लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण उत्साहात पार पडले. आ.बोंढारकर यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले.
या अंतर्गत बाभुळगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून 20 लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक, जयसींग तांडा येथे वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेतून 25 लाख, राजू तांडा येथे 20 लाख, हेमला तांडा येथे 25 लाख रुपयांची पेव्हर ब्लॉक कामे पूर्ण करण्यात आली आहेत. धनगरवाडी परिसरात अण्णाभाऊ साठे नगर येथे अनु.जाती व नवबौद्ध वस्ती योजनेतून 5 लाख रुपयांचा सी.सी. रस्ता व 5 लाख रुपयांची सिमेंट नाली, खंडोबा मंदिर परिसरात 4 लाख रुपयांचे पेव्हर ब्लॉक, जयमल्हार नगर येथे 15 लाख, जुनेगाव वस्ती येथे 9 लाख, खंडोबा नगर येथे 15 लाख तसेच अहिल्यादेवी होळकर नगर येथे 20 लाख रुपयांचा सी.सी. रस्ता अशी विविध कामे पूर्ण झाली. तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेवडी-सोनखेड रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत पेनूर-शेवडी-सोनखेड-कलंबर-बारुळ या मार्गाच्या सुधारणा कामासाठी 18 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. दगडगाव येथील श्री खंडोबा मंदिर परिसरात 10 लाख रुपयांच्या सभागृह बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. जयमल्हार नगर व शिवमल्हार नगर येथे प्रत्येकी 7 लाख रुपयांचे सी.सी. रस्ते, गावातील मुख्य रस्त्यावर 20 लाख रुपयांचे काम, पंचशील नगर येथे 4 लाख रुपयांचे विद्युतीकरण, लहुजीनगर येथे 10 लाख, सम्राट अशोक नगर व कुशीनगर येथे प्रत्येकी 5 लाख रुपयांची कामे पूर्ण करण्यात आली. या विकासकामांमुळे संबंधित भागातील नागरिकांना दर्जेदार रस्ते व मूलभूत सुविधा उपलब्ध होणार असून, त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वास आ. बोंढारकर यांनी व्यक्त केला. पुढील काळातही विकासकामांना गती देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विनय गिरडे, तालुकाप्रमुख अशोक मोरे, उद्धव पाटील शिंदे, शहरप्रमुख सुहास खराणे, गणेशराव मोरे,अशोक मोरे, दाजीबा राठोड, बाभुळगाव सरपंच पुंडलिक मस्के, प्रकाश नवरे, राजू उराडे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS