Homeताज्या बातम्या

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू कन्या विद्यालयात क्रीडा स्पर्धांचा उत्साह! विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

बीड: श्री. छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ, बीड संचलित राजर्षी शाहू कन्या विद्यालय, तेलगाव रोड येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनि

अकोलेत विद्यार्थ्यांना आरोग्य जागृती अभियानांतर्गत मार्गदर्शन; पौगंडावस्था, मुखआरोग्य आणि व्यसनमुक्तीवर व्याख्यान
नांदेड शहरातील डी-मार्ट रोडवरील झाडांची विनापरवाना कत्तल? जाहिरात फलकांसाठी हरित संपदेवर घाला; कारवाईची मागणी
शहीद जवानांच्या वारसांना शेतजमीन हस्तांतरणासाठी मुद्रांक शुल्क पूर्णपणे माफ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

बीड: श्री. छत्रपती राजर्षी शाहू समाज प्रबोधन मंडळ, बीड संचलित राजर्षी शाहू कन्या विद्यालय, तेलगाव रोड येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २४ जुलै २०२६ रोजी भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींमध्ये क्रीडाप्रेम, शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धांचे उद्घाटन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त व संस्थेचे सचिव प्रा. जे. पी. शेळके यांच्या हस्ते झाले. यावेळी विविध वयोगटांतील विद्यार्थिनींनी खो-खो, धावणे, लांब उडी, दोरीवरील उडी आदी स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. मैदानावर विद्यार्थिनींच्या जोशपूर्ण सहभागामुळे अत्यंत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष इंजि. बलभीमराव जाहेर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. जे. पी. शेळके, संस्थेचे संचालक श्री. विश्वनाथराव माणूसमारे तसेच मुख्याध्यापिका श्रीमती एस. डी. कदम, मुख्याध्यापक श्री. आर. टी. राऊत, प्राचार्या श्रीमती आर. डी. लोखंडे आणि राष्ट्रीय खो-खो खेळाडू श्री. तुकाराम करांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

प्रा. जे. पी. शेळके यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन करताना शिक्षणासोबत क्रीडा संस्कारही महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थिनींनी खेळामध्ये सक्रिय सहभाग घेऊन व्यक्तिमत्त्व विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय भाषणात इंजि. बलभीमराव जाहेर पाटील यांनी यशासाठी सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि चिकाटी आवश्यक असल्याचे नमूद करत विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. सी. जगताप यांनी केले, तर श्री. के. बी. सोंडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिक्षक, कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींच्या मोठ्या उपस्थितीत हा क्रीडा सोहळा उत्साहात पार पडला.

COMMENTS