Homeताज्या बातम्या

राम मंदिरातील देणगी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील आरोपांनंतर गणवेशाचे खिसे कापण्याचा निर्णय

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर येथे देणगी मोजणीत झालेल्या कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या एसआयटी (SIT) चौकशीचा परिणाम आता व्यवस्थापनावरही दिस

३ कोटींच्या ७०२ किलो गांजाच्या साठ्यासह दोघांना अटक; एनसीबीची गोंदियात मोठी कारवाई
“न्यायासाठी प्रामाणिकपणे लढणारा वकीलच यशस्वी होतो” – भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा; राहात्यात ॲड. संदीप पुंड यांचा गौरव
अमेरिका-इराण शांतता चर्चेला वेग; कायमस्वरूपी कराराबाबत अद्याप प्रतीक्षा
अयोध्येतील राम मंदिराच्या देणग्यांमधील गैरव्यवहाराच्या आरोपाचं नेमकं प्रकरण  काय? आतापर्यंत काय काय घडलं? - BBC News मराठी

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर येथे देणगी मोजणीत झालेल्या कथित अनियमिततेबाबत सुरू असलेल्या एसआयटी (SIT) चौकशीचा परिणाम आता व्यवस्थापनावरही दिसून येत आहे. चौकशीदरम्यान बँक व्यवस्थापनाने देणगी मोजणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेस कोड लागू केला असून, आता या कर्मचाऱ्यांना खिसेविरहित (खिसे नसलेला) गणवेश परिधान करावा लागणार आहे.

उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील राम मंदिरातील देणगी प्रकरणाच्या एसआयटी चौकशीदरम्यान करारातील नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे. चौकशीच्या कक्षेत आलेल्या काही कर्मचाऱ्यांना कामावरून मुक्त करण्यात आले आहे. तसेच बँक व्यवस्थापनाने मोजणी कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम लागू केले आहेत.

राम मंदिर भवन निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्र यांनी एका मुलाखतीत यासाठी थेट बँक व्यवस्थापनाला जबाबदार धरले होते. त्यांच्या मते, करारामध्ये स्पष्ट नियम असताना मोजणी कर्मचाऱ्यांनी त्यांचे पालन का केले नाही, हा मुख्य प्रश्न आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या ग्राहकाच्या कामासाठी बँकेने वाराणसीतील एका आउटसोर्सिंग कंपनीमार्फत श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला कर्मचारी उपलब्ध करून दिले होते. या कर्मचाऱ्यांचे वेतनही त्याच कंपनीमार्फत दिले जात होते.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे ९० टक्के नियुक्त्या ट्रस्ट मधील पदाधिकाऱ्यांच्या प्रभावामुळे झाल्या होत्या. तसेच वेळोवेळी नियमांमध्ये शिथिलताही त्यांच्याच शिफारशीवरून देण्यात आली होती. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा करार दोन्ही बाजूंनी झाला होता. बँकेने स्वतःहून कर्मचारी लादले नव्हते. अशा संवेदनशील कामासाठी बँकेचे नियमित कर्मचारीच नियुक्त करणे अपेक्षित होते.

COMMENTS