श्रीगोंदा : तालुक्यातील शिरसगाव बोडखा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी रंगनाथ बाळासाहेब देशमुख यांची बिनविरोध निवड करण्या

श्रीगोंदा : तालुक्यातील शिरसगाव बोडखा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी रंगनाथ बाळासाहेब देशमुख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे सोसायटीच्या कारभाराला नवे बळ मिळणार असल्याची भावना संचालक मंडळ व सभासदांनी व्यक्त केली.
सोसायटीच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत रंगनाथ देशमुख यांची व्हाईस चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सोसायटीचे विद्यमान चेअरमन भानुदास सूर्यकांत सोमवंशी, संचालक प्रकाश सोमवंशी, जुबेर सय्यद, राहूल सोमवंशी, शिवाजी लगड, संभाजी गायकवाड, संभाजी धारकर, वाल्मिक दळवी, शांताबाई उबाळे, संजय उबाळे, अलका सोमवंशी, पुष्पलता सोमवंशी तसेच सोसायटीचे सचिव भाऊसाहेब निंभोरे उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना उपस्थित मान्यवरांनी सहकार क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकरी सभासदांच्या हितासाठी सोसायटीच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. रंगनाथ देशमुख यांनीही सर्व संचालक, सभासद आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत सोसायटीच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची ग्वाही दिली.
या निवडीबद्दल सूर्यकांत सोमवंशी, बाळासाहेब सोमवंशी, डॉ. संतोष देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी रंगनाथ देशमुख यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शिरसगाव बोडखा परिसरात या निवडीचे स्वागत करण्यात येत असून सहकार क्षेत्राला यामुळे नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

COMMENTS