Homeताज्या बातम्या

कार्यकाळ संपल्याने केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांचा राजीनामा

नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो तत्क

ठाकरेंच्या सेनेत पुन्हा फूट ?
लोकसभेच्या जागा ८२४ करण्याची शिफारस; १७० मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा प्रस्ताव
ठाकरे गटाचे ‘ऑपरेशन टायगर’वर शिक्कामोर्तब ! ठाकरेंच्या बैठकीला सहा खासदार गैरहजर
George Kurian – राज्यसभेची उमेदवारी नाकारली; भाजप नेते जॉर्ज कुरियन यांचा  केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा | Saamana (सामना)

नवी दिल्ली : केंद्रीय अल्पसंख्याक विभागाचे राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो तत्काळ प्रभावाने स्वीकारला आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार संविधानाच्या कलम ७५(२) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली.

जॉर्ज कुरियन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून ते केरळमधील पक्षाचा महत्त्वाचा चेहरा मानले जातात. केरळ विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले होते. मात्र, त्यांचा राज्यसभा कार्यकाळ २१ जून रोजी संपुष्टात आल्याने त्यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ६५ वर्षीय जॉर्ज कुरियन हे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यापासून पक्षाशी जोडलेले आहेत. ऑगस्ट २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात त्यांची केंद्रीय राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

COMMENTS