Homeताज्या बातम्या

जोर्वे येथील यशदीप दिघे आर्मीमध्ये ‘लेफ्टनंट’पदी; डेहराडून येथील एनडीएचे प्रशिक्षण पूर्ण, लेह-लडाखमध्ये होणार तैनात

संगमनेर : तालुक्यातील जोर्वे येथील सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र रावसाहेब दिघे यांचे चिरंजीव यशदीप उर्फ सनी राजेंद्र दिघे हे डेहराडून येथून एनडीएचे

पंतप्रधान मोदींचा विक्रम ; केंद्रीय मंत्रिमंडळाकडून गौरवसर्वाधिक काळ पंतप्रधान म्हणून पदावर राहण्याचा विक्रम
राजधानीत महात्मा फुले यांना अभिवादन;राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
उज्ज्वला सोयम यांना ‘राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार

संगमनेर : तालुक्यातील जोर्वे येथील सेवानिवृत्त सैनिक राजेंद्र रावसाहेब दिघे यांचे चिरंजीव यशदीप उर्फ सनी राजेंद्र दिघे हे डेहराडून येथून एनडीएचे (NDA) खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. त्यांची लेह-लडाख येथे लेफ्टनंट पदावर आर्मीमध्ये नियुक्ती झाली आहे.

जोर्वे येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले राजेंद्र दिघे यांनी भारतीय सैन्यामध्ये २७ वर्षे प्रदीर्घ सेवा दिली. विशेष म्हणजे, ज्या दिवशी ते सैन्यातून निवृत्त झाले, त्याच दिवशी त्यांचा मुलगा यशदीप याची एनडीएसाठी निवड झाली होती. यशदीपने पुणे येथील खडकवासला येथे तीन वर्षांचे आणि त्यानंतर डेहराडून येथे एक वर्षाचे यशस्वी प्रशिक्षण पूर्ण केले. भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, विविध केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत डेहराडूनच्या अकॅडमीमध्ये हा दीक्षान्त व पदग्रहण समारंभ मोठ्या शानदार पद्धतीने संपन्न झाला.

या ऐतिहासिक क्षणी यशदीपचे वडील मेजर राजेंद्र दिघे, आई पूजा दिघे आणि प्रांजल दिघे यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. “लहानपणापासूनच भारतीय सैन्यातून देशसेवा करण्याचे माझे स्वप्न होते, ते आज पूर्ण झाले,” अशी भावना लेफ्टनंट यशदीप दिघे यांनी यावेळी व्यक्त केली. यशदीप हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ यांचे भाचे आहेत. या देदीप्यमान यशाबद्दल माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह अहिल्यानगर व संगमनेर परिसरातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS