Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दीपक थोरात ईलाईट क्लब’ ला ‘सिल्वर’ पुरस्कार

शेवगाव  : शेवगाव : इंडस्ट्रियल ऑटोमोटिव्ह मशिनरीसाठी दर्जेदार बेअरिंग निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी असलेल्या एसकेएफ इंडिया लिमिटेड

शेवगाव पोलिसांची धडक कारवाईअवैध वाळू वाहतूक व गोमांस विक्रीवर छापे ; लाखोंचा मुद्देमाल जप्त
शेवगाव-पाथर्डीत अवैध वृक्षतोडीवर वन विभागाची कारवाई 
शेवगावात अवैध गोमांस विक्रीवर पोलिसांचा छापा१७० किलो साठा जप्त; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

शेवगाव  : शेवगाव : इंडस्ट्रियल ऑटोमोटिव्ह मशिनरीसाठी दर्जेदार बेअरिंग निर्मिती क्षेत्रात जागतिक स्तरावर अग्रस्थानी असलेल्या एसकेएफ इंडिया लिमिटेडतर्फे दिला जाणारा ‘ईलाईट क्लब सिल्वर’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार भोसरी (पुणे) येथील एसकेएफ ऑटोमोटिव्ह डिस्ट्रीब्यूटर ‘बालाजी इंजिनियरिंग कार्पोरेशन’चे संचालक तथा युवा उद्योजक दीपक रामनाथ थोरात यांना प्रदान करण्यात आला.जयपूर (राजस्थान) येथे आयोजित देशपातळीवरील एसकेएफच्या निवडक वितरकांच्या परिषदेत कंपनीचे कार्यकारी संचालक (भारत) गौरव मिश्रा व मार्केटिंग विभाग प्रमुख कुमारेश्वरन यांच्या हस्ते हा पुरस्कार समारंभपूर्वक देण्यात आला.दीपक थोरात हे अहिल्यानगर जिल्ह्यातील वरुर खुर्द (ता. शेवगाव) येथील रहिवासी असून ते सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आले आहेत. सन २०१३ पासून ते एसकेएफ या नामांकित कंपनीशी वितरक म्हणून जोडले गेले असून सचोटी व प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.ग्राहकांना दर्जेदार सेवा देत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळेच त्यांची या सर्वोच्च आणि प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. ग्रामीण भागातील एका युवा उद्योजकाने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरत असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS