Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून पशू पक्षांसाठी अन्न-पाण्याची सोय 

कोपरगाव : शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून युवा नेते विवेक कोल्हे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संजीवनी प्रतिष्ठानच्

समाजसेवेचा गौरव; गौतम कांबळे पद्मपाणि पुरस्काराने सन्मानित
किरण डोळस यांना राज्यस्तरीय पद्मपाणी पुरस्कार जाहीर
शब्द कमी पडतील वर्णनाला, बाजीराव चव्हाण नाव पुरे प्रेरणेला..!इमामपूरच्या मातीतून मुंबईपर्यंतचा प्रवास; सेवाभावी कार्यातून घडलेले लोकाभिमुख नेतृत्व

कोपरगाव : शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून युवा नेते विवेक कोल्हे यांचा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संजीवनी प्रतिष्ठानच्या युवा सेवकांच्या माध्यमातून कोपरगाव शहरात भीषण पडलेल्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची तर पक्षांसाठी बर्ड्स वॉटर फीडरची व्यवस्था करून देण्यात आली असून कोपरगावकरांनी या कौतुकास्पद उपक्रमाचे स्वागत केले आहे.स्व.शंकरराव कोल्हे यांच्या ‘सेवा हाच धर्म’ या शिकवणीचा आदर्श घेऊन युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्दर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानचे समस्त युवा सेवक मागील अकरा वर्षांपासून कोपरगाव शहरासह तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. सोमवारी  (दि.२७) विवेक कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरांत मुक्या जनावरांना पाण्याची तर पक्ष्यांसाठी बर्ड्स फीडर्सची व्यवस्था करण्यात आली आहे.या उपक्रमांतर्गत शहरात सुमारे 100 ठिकाणी बर्ड्स फीडर्स बसविण्यात आले असून ठिकठिकाणी पाण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात मुक्या जनावरांना पाणी  तर पक्षांसाठी अन्न उपलब्ध होणार आहे. तसेच पक्षांसाठी लावण्यात आलेल्या फीडर्सची देखभाल करण्याची जबाबदारी शहरातील व्यापारी व नागरिकांनी स्वीकारली असून ते नियमितपणे पाणी व अन्न उपलब्ध करून देणार आहेत. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक करत विवेक कोल्हे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. 

COMMENTS