Homeताज्या बातम्या

टंचाई विभागातील कर्मचारी कायम गैरहजर? पत्रकारांच्या पाहणीत टेबल रिकामे; हालचाल नोंदीबाबतही प्रश्न उपस्थित

शेवगाव : शेवगाव तालुक्यात सध्या टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होत असताना पंचायतसमितीत टंचाई विभागातील कर्मचारी हे अनेकदा आपल्या कार्यालयीन टेबलवर

अक्षय कर्डिलेंची बदनामी करणाऱ्याचा छडा लावावा; अन्यथा आंदोलन ; भाजप कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा
राज्यस्तरीय महाराष्ट्र आयकॉन्स 2026 पुरस्कार सोहळ्याचे अहिल्यानगर येथे आयोजनविविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार राज्यस्तरीय गौरव
मतदारांचा विश्वास सार्थ ठरवू : नगराध्यक्ष आव्हाड


शेवगाव : शेवगाव तालुक्यात सध्या टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण होत असताना पंचायतसमितीत टंचाई विभागातील कर्मचारी हे अनेकदा आपल्या कार्यालयीन टेबलवर अनुपस्थित असल्याचा आरोप समोर येत आहे. हजेरी मस्टरवर नियमित स्वाक्षऱ्या होत असल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित कर्मचारी कार्यालयीन वेळेत टेबलवर उपलब्ध नसल्याने नागरिक व पत्रकारांमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
 टंचाई काळामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली आस्थापना विनाकारण सोडू नये, तसेच कार्यालयीन कामकाजासाठी उपलब्ध राहावे, असे शासनाचे स्पष्ट निर्देश असल्याचे सांगितले जाते. मात्र, संबंधित कर्मचारी वारंवार अनुपस्थित असल्याची चर्चा सुरू असून, त्यांच्या टेबल व खुर्ची कायम रिकाम्या दिसत असल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या तालुक्यात चारा टंचाई, जनावरांच्या छावण्यांचे निरीक्षण, पावसाबाबत शासनाकडून करण्यात आलेली भाकिते, तसेच एल निनो परिस्थितीचा संभाव्य परिणाम यांसंदर्भातील उपाययोजनांवर चर्चा आणि प्रत्यक्ष पाहणी होणे अपेक्षित असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. अशा परिस्थितीत संबंधित विभागातील जबाबदार कर्मचाऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे.
 मंगळवार, दि. ९ रोजी काही वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींनी संबंधित विभागाला भेट दिली असता तेथील कर्मचारी हे कार्यालयात अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांनी बाहेरगावी अथवा अन्य कार्यालयीन कामासाठी गेल्याची नोंद हालचाल डायरीमध्ये आढळून आली नसल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही स्पष्ट माहिती नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, शेवगाव-पाथर्डी तालुक्यात टंचाईसदृश्य परिस्थिती असतानाही आचारसंहितेमुळे अद्याप टंचाई आढावा बैठका आयोजित झालेल्या नसल्याची बाबही समोर येत आहे.
दरम्यान, या संदर्भात संबंधित कर्मचाऱ्याकडून लेखी खुलासा मागविण्यात येणार असल्याची माहिती आर. एस. धस, सहाय्यक गटविकास अधिकारी, शेवगाव यांनी दिली.

COMMENTS