Homeताज्या बातम्या

रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक घटनापीएचडी करणारे विद्यार्थी राहुल सोनाळे यांनी केली आत्महत्या

 नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या भाषा संकुल परिसरातील झाडाला गळफास घेऊन सोश

शिक्षणासोबत संस्कारासह सामाजिक बांधिलकी जोपासावी : प्रा. माने
बी.फार्मसी कॉलेज व युनिरेवा हेल्थकेअर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्नग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना फार्मा क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध
‘स्वारातीम’ विद्यापीठाचा मोठा निर्णय; 24 महाविद्यालयांतील बी.एस्सी. प्रथम वर्ष प्रवेशाला स्थगितीप्रयोगशाळा नसलेल्या, पात्र प्राध्यापक आणि ट्रिपल ए अंकेक्षणातीलत्रुटींमुळे कारवाई; विद्यार्थी-पालकांनी प्रवेशापूर्वी मान्यता तपासण्याचे आवाहन



 नांदेडमधील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या भाषा संकुल परिसरातील झाडाला गळफास घेऊन सोशल वर्क विषयात पीएचडी करणारे विद्यार्थी राहुल सोनाळे यांनी आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास गस्तीवर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास हा प्रकार आला.
राहुल सोनाळे हे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सोशल वर्क विषयात पीएचडीचे संशोधक विध्यार्थी होते. त्यांच्या निधनामुळे विद्यापीठ परिसरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला असून, आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

COMMENTS