Homeताज्या बातम्या

प्रतिबंधित औषधांच्या गोळ्यांवर नांदेड ग्रामीण पोलिसांचा घाव; बोलेरोसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड : अंमली पदार्थविवरोधी विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधित औषधांच्या गोळ्यांची वाहतूक करणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई करत

बारवी धरणाकरिता अतिरिक्त जमिन संपादित करून शेतकऱ्यांना मोबदला देणार : मंत्री उदय सामंत
अ‍ॅड. आंबेडकर अकोल्यातून लढणार लोकसभा निवडणूक
जूननंतरच चित्र स्पष्ट! चिखलीकर, आष्टीकर, सुमठाणकर, जवळगावकर ; विरोधकांचा अंतिम उमेदवार कोण?


नांदेड : अंमली पदार्थविवरोधी विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी प्रतिबंधित औषधांच्या गोळ्यांची वाहतूक करणार्‍यांविरुद्ध धडक कारवाई करत 12 लाख 2 हजार 717 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत प्रतिबंधित प्रेगा गॅबलीन औषधांच्या 110 गोळ्या आणि एक बोलेरो वाहन जप्त करण्यात आले असून, चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत पोलिसांनी 11 पाकिटांमधील एकूण 110 प्रतिबंधित गोळ्या (किंमत 2 हजार 717 रुपये) तसेच एमएच-26 सीएच-3876 क्रमांकाची पांढर्‍या रंगाची बोलेरो (अंदाजे किंमत 12 लाख रुपये) ताब्यात घेतली. या प्रकरणी रजनेश उत्तम खंदारे, अदीत गणेश गिरी, बुद्धभूषण गणेश हटकर आणि दिगांबर गणेश कपाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर आरोपी तसेच प्रतिबंधित औषधांच्या पुरवठा साखळीचा शोध घेण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या कारवाईस अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील साळुंके व त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. प्रतिबंधित औषधांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणार्‍यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा पोलिसांनी केले आहे.

COMMENTS