बीड: महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्
बीड: महाराष्ट्र राज्याच्या पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष इर्शादभाई यांनी सामाजिक बांधिलकी जपत गुरुकुल गोशाळेत गोवंशांना चारा व पाणी वाटप केले. अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत त्यांनी समाजासमोर सेवाभावाचा एक वेगळा आदर्श ठेवला आहे.
गुरुकुल गोशाळेत सुमारे २४० देशी गाईंचे संगोपन करण्यात येते. या सर्व गोवंशांना चारा व पाणी देऊन इर्शादभाई यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमाबद्दल गुरुकुल गोशाळेच्या व्यवस्थापकांनी आनंद व्यक्त करत इर्शादभाई यांच्या गोसेवा व सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी बाबुराव खाडे, फारुखभाई शेख, बिलालभाई, मोसिन, मौलाना कादरी फाउंडेशन महाराष्ट्रचे अध्यक्ष शहेबाज कादरी, रियाज सिद्दिकी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS