Homeताज्या बातम्यादेश

संसदेतील इंग्रजी प्रश्‍नावर नारायण राणेंचा गोंधळ

नवी दिल्ली ः संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात भाजप खासदाराने इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्‍नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यां

आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही : नारायण राणे (Video)
राणेंना राज्यसभेवर संधी नाहीच
उद्धव ठाकरे ‘जनाची नाही तर मनाची लाज बाळगा’

नवी दिल्ली ः संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात भाजप खासदाराने इंग्रजीतून विचारलेल्या प्रश्‍नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची चांगलीच भंबेरी उडाल्याचे दिसून आले. इंग्रजीत प्रश्‍न विचारला गेला अन् नारायण राणे यांची उत्तर देताना चांगलीच त्रेधातिरपीट झाली.
राज्यसभेतील भाजपचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्यासंदर्भात प्रश्‍न विचारला. एमएसएमई क्षेत्रातील कामगार आणि कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत? असा प्रश्‍न त्यांनी इंग्रजीतून विचारल्याने नारायण राणे गडबडले. उत्तर देता देता त्यांची त्रेधा तिरपिट उडाली. भाजप खासदार कार्तिकेय शर्मा सुरूवातीला काय प्रश्‍न विचारला आहे, हे नारायण राणे यांना कळलेच नाही. त्यामुळे एमएसएमईमध्ये सरकार निर्यात तशा पद्धतीने वाढवणार अशा आशयाचं उत्तर त्यांनी दिलं. एमएसएमई क्षेत्रात निर्यात वाढविण्यासाठी सरकारकडून ’मेन इन इंडिया योजने’च्या अंतर्गत विविध कार्यक्रम आखलेले आहेत, असे उत्तर नारायण राणे देत होते. त्यानंतर राणे यांना प्रश्‍न नीट समजला नसल्याचे पीठासीन अधिकार्‍यांच्या लक्षात आले तसेच सभागृहात गोंधळ वाढला. त्यामुळे हरिवंश यांनी राणे यांना सावरले. ते राणे यांना म्हणाले, तुम्ही सभागृहाचे कामकाज संपल्यावर खासदार कार्तिकेय यांना या प्रश्‍नाचे उत्तर द्या, असे सांगून त्यांनी राणे यांना सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला.

COMMENTS