वडवणी: आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पोखरी येथे जाणार्या वारकर्यांच्या सेवेसाठी रुई (पिंपळा) गावचे युवा सरपंच ॲड. मयुर भैय्या आंधळे यांनी पु

वडवणी: आषाढी एकादशीनिमित्त श्री क्षेत्र पोखरी येथे जाणार्या वारकर्यांच्या सेवेसाठी रुई (पिंपळा) गावचे युवा सरपंच ॲड. मयुर भैय्या आंधळे यांनी पुढाकार घेत दिंडीतील भाविकांसाठी पाणी, चहा व फराळाची उत्तम व्यवस्था केली. “वारी, भक्ती आणि वारकर्यांची सेवा या माध्यमातूनच विठुरायाचे दर्शन घडते,” अशी भावना सरपंच मयुर आंधळे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
वडवणी तालुक्यातील विविध भागातून आषाढी एकादशीनिमित्त धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्या श्री क्षेत्र पोखरी येथील मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर दिंड्या दाखल होतात. याच पार्श्वभूमीवर रुई (पिंपळा) गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ५०० वारकर्यांची दिंडी श्री क्षेत्र पोखरीकडे मार्गस्थ झाली. या दिंडीत महिला, तरुण व भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
वारकर्यांना प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सरपंच ॲड. मयुर भैय्या आंधळे व त्यांच्या सहकार्यांनी दिंडीसोबत राहून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. मंदिर परिसरात दिंडी पोहोचल्यानंतर वारकर्यांना मिनरल वॉटर (बिसलेरी), गरम चहा आणि फराळाचे वाटप करण्यात आले. तसेच केवळ रुई गावच्या दिंडीतीलच नव्हे, तर पोखरी येथे आलेल्या इतर दिंड्यांमधील वारकर्यांनाही ही सेवा देण्यात आली. या तत्पर सेवाभावाबद्दल उपस्थित सर्व वारकर्यांनी सरपंच मयुर आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानून त्यांना उदंड आयुष्याचा आशीर्वाद दिला.

COMMENTS