Homeताज्या बातम्याअहमदनगर

शिवसेना उपजिल्हाप्रमुख भागवत मुंगसे यांचे निधन

देवळाली प्रवरा : येथील कट्टर शिवसैनिक तथा शिवसेना (ठाकरे गट) उपजिल्हाप्रमुख भागवत बाळासाहेब मुंगसे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्यावर मंगळवारी (दि. २८ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता देवळाली प्रवरा येथील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.भागवत मुंगसे हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात एकनिष्ठ आणि कट्टर शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. नुकत्याच पार पडलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत पक्षाच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या निधनामुळे शिवसैनिकांमध्ये शोककळा पसरली असून, एक निष्ठावान, कट्टर आणि कार्यतत्पर नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे

पालावरच्या माणसांची शासनाकडे नोंदच नाही?भटके-विमुक्तांच्या घरगणनेसाठी ‘मुशाफिरी यात्रा’; शासकीय नोंदीत समावेशाची मागणी
घारगाव–पिंपळगाव पिसा रस्त्यालगत उघडी विहीरअपघाताचा धोका;  प्रशासनाने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
कोपरगाव तालुक्यातील २१ ग्रामपंचायतीची तपासणी

COMMENTS