Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऊस वाहतुकीसाठी सीएनजी वापरावर भर देणार : डॉ. सुरेश भोसले

शिवनगर : हंगाम सांगता समारंभात ऊस तोडणी वाहतूकदारांचा सत्कार करताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले बाजूस उपाध्यक्ष जगदीश जगताप व मान्यवर संचा

अवकाळी पावसाने हिरावला शेतकऱ्याचा तोंडाला आलेला घास 
कवठेत शॉटसर्किटने आग लागून पन्नास गुंटे ऊस जळुन खाक; अडीच लाखाचे नुकसान
पाटण तालुक्यात पत्रकार दिनी ऊसतोड मजुरांच्या बालकांना खाऊ वाटप

‘कृष्णा’चे 13 लाख 38 हजार मे. टन गाळप; गळीत हंगामाची सांगता
कराड / प्रतिनिधी : ऊस वाहतुकीसाठी लागणार्‍या डिझेल ऐवजी सीएनजी गॅसचा वापराकडे एक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. कृष्णा कारखान्याकडून येत्या काळात सीएनजीच्या वापरावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2021-22 च्या 62 व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी संचालक लिंबाजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कविता पाटील यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा झाली. यावेळी व्हा. चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, संजय पवार, जयसिंग माने, किरण थोरात, रेठरे बुद्रुकचे उपसरपंच शिवाजी चव्हाण, एम. के. कापूरकर उपस्थित होते.
चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, ऊस तोडणी वाहतूकदार, कामगार व अधिकारी वर्गाने चांगले काम केले म्हणून हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. सर्वांनी अडचणींवर मात करत गळीत हंगाम यशस्वी करून दाखवला. येणारा हंगामही लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे. ऑफ सिझनची कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. तसेच टप्प्या टप्प्याने कारखान्यात सुधारणा कराव्या लागणार आहेत.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याने या हंगामात इतिहासातले उच्चांकी असे द्वितीय क्रमांकाचे ऊस गाळप केले आहे. येत्या काळात कमी दिवसांत कारखान्यात विस्ताराचे काम पूर्ण करायचे आहे. त्या दृष्टीने सुरेश बाबांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. पुढील हंगामात कारखान्याने 15 लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करावी.
व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, या हंगामात नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला तरीही सर्व तोडणी वाहतूकदार, कर्मचारी अधिकारी यांनी चांगले नियोजन करत उत्कृष्टपणे विक्रमी ऊस गाळप केले.
कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी प्रास्तविकात कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सादर केला. ते म्हणाले, कृष्णा कारखान्याने 185 दिवसांमध्ये 13 लाख 38 हजार 750 मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, 14 लाख 89 हजार क्िंवटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा 12.54 टक्के इतका राहिला. शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचार्‍यांनी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल दळवी यांनी आभार मानले. यावेळी ऊस तोडणी वाहतूकदार व शेती विभागाचे कर्मचार्‍यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार, अधिकारी व कर्मचारी आदी याप्रसंगी उपस्थित होते. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.

गळीत हंगाम दृष्टीक्षेप
रेक्टिफाइड स्पिरिट निर्मीती ः 2 कोटी 10 लाख 4488 लिटर्स (कृष्णाच्या इतिहासातील उच्चांकी उत्पादन)
इथेनॉल निर्मिती ः 1 कोटी 11 लाख लिटर्स
विज निर्मिती ः 6 कोटी 07 लाख 41 हजार युनिट
विज निर्यात ः 3 कोटी 12 लाख 58 हजार युनिट
ऊस रोपे निर्मिती ः 12 लाख 58 हजार 140
जिवाणू खत निर्मिती ः 54 हजार 850 लिटर्स
कंपोस्ट निर्मिती ः 22 हजार मेट्रिक टन
गांडूळ खत निर्मिती ः 3470 पोती
जयवंत आदर्श कृषी योजनेत सहभागी सभासद ः 4031

COMMENTS