कोपरगाव : रब्बी हंगामात नुकसान झाले तर खरीपात भरून निघेल, या आशेवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाबरोबरच काही बियाणे कंपन्यांकडूनही फटका बसत असल्याचे चित्र आहे. कोपरगाव मतदारसंघातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे मोठे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला असून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.याबाबत आमदार काळे यांनी कृषी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोपरगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी विविध नर्सरीमधून सिजेंटा व सिंबा कंपनीची टरबूज रोपे खरेदी करून लागवड केली होती. मात्र ही रोपे निकृष्ट दर्जाची ठरल्याने पिकांना रोगराईचा मोठा फटका बसला. परिणामी अनेक शेतकऱ्यांची टरबूज शेती पूर्णतः नष्ट होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने २५ मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत सुमारे २५ एकर क्षेत्रावरील टरबूज पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. तसेच संबंधित कंपन्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.निकृष्ट दर्जाची रोपे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार काळे यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन दरम्यान, या प्रकरणात स्वतः लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आमदार काळे यांनी आमचे गाऱ्हाणे थेट मंत्र्यांपुढे मांडल्याने न्याय मिळेल, असा विश्वास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

कोपरगाव : रब्बी हंगामात नुकसान झाले तर खरीपात भरून निघेल, या आशेवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना निसर्गाबरोबरच काही बियाणे कंपन्यांकडूनही फटका बसत असल्याचे चित्र आहे. कोपरगाव मतदारसंघातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांचे निकृष्ट दर्जाच्या रोपांमुळे मोठे नुकसान झाल्याचा प्रकार समोर आला असून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.याबाबत आमदार काळे यांनी कृषी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, कोपरगाव मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी विविध नर्सरीमधून सिजेंटा व सिंबा कंपनीची टरबूज रोपे खरेदी करून लागवड केली होती. मात्र ही रोपे निकृष्ट दर्जाची ठरल्याने पिकांना रोगराईचा मोठा फटका बसला. परिणामी अनेक शेतकऱ्यांची टरबूज शेती पूर्णतः नष्ट होऊन मोठे आर्थिक नुकसान झाले.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तालुकास्तरीय तक्रार निवारण समितीने २५ मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत सुमारे २५ एकर क्षेत्रावरील टरबूज पिकाचे शंभर टक्के नुकसान झाल्याचा अहवाल देण्यात आला आहे. तसेच संबंधित कंपन्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.निकृष्ट दर्जाची रोपे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असून त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या संकटात भर पडली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपन्यांवर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आमदार काळे यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई देण्याचे आश्वासन
दरम्यान, या प्रकरणात स्वतः लक्ष घालून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. आमदार काळे यांनी आमचे गाऱ्हाणे थेट मंत्र्यांपुढे मांडल्याने न्याय मिळेल, असा विश्वास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS