Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेकनूरमध्ये भीषण पाणीटंचाई; ग्रामपंचायतीविरोधात नागरिकांमध्ये संताप

नेकनूर : शहरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत असून, ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम व नियोजनशून्य कारभारामुळे परिस्थित

साई सेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांचा संताप‘बचाव कृती समिती’चे तहसीलसमोर उपोषण
विकासनगर सोसायटीतील 25 टक्के भाग ड्रेनेजपासून वंचित; नागरिकांचा तीव्र संताप
कुकडीच्या लिंक कॅनॉलवरील पाणी वाटपावरून वाद; अन्यायकारक वितरणाविरोधात पाणी वापर संस्थांचा एल्गार; आंदोलनाचा इशारा

नेकनूर : शहरातील नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करत असून, ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम व नियोजनशून्य कारभारामुळे परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत असून, अनेकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
गावातील नळयोजना पूर्णपणे ठप्प झाली असून, महिलांना व नागरिकांना डोक्यावर हंडे घेऊन दूरवरून पाणी आणावे लागत आहे. विशेषतः गरीब कुटुंबांसाठी ही परिस्थिती अत्यंत हालअपेष्टांची ठरत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्याचा प्रश्न अधिकच बिकट बनत चालला आहे. नागरिकांचा आरोप आहे की, ग्रामपंचायतीकडून केवळ उद्घाटन सोहळे, फोटोसेशन आणि कागदोपत्री योजना राबविण्यावर भर दिला जातो. प्रत्यक्षात मात्र पाणी, स्वच्छता आणि वीज यांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत आहे. शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च होऊनही कायमस्वरूपी उपाययोजना झाल्या नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. दरम्यान, प्रशासनाने तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, बंद पडलेली नळयोजना तातडीने दुरुस्त करावी आणि दीर्घकालीन उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

आम्हाला पाणी हवे, आश्वासने नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत असून, लवकरच आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी आता दिखावा न करता ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनतेचा रोष उग्र आंदोलनात परिवर्तित होईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
– शेख सद्दाम सकलेन

COMMENTS