Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई सेवा पतसंस्थेच्या ठेवीदारांचा संताप‘बचाव कृती समिती’चे तहसीलसमोर उपोषण

श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथील साई सेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था प्रकरणी ठेवीदारांचा संताप तीव्र झाला असून, आपल्या हक्काच्या पैशांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ‘साई सेवा बचाव कृती समिती’च्या वतीने बुधवारी (दि. १५) तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली. “आमचे पैसे परत द्या, आमचा हक्क द्या; अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा देत ठेवीदारांनी प्रशासनावर दबाव वाढवला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी झाले असून, प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. समितीच्या वतीने तहसील प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात ठेवीदारांच्या हितासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांना मूळ रकमेसह व्याजाची तात्काळ परतफेड करावी, संस्थेचे अध्यक्ष, संचालक व संबंधितांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करावी, तसेच या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी प्रमुख मागणी आहे. याशिवाय संबंधितांची चल-अचल मालमत्ता जप्त करून लिलावातून ठेवीदारांना पैसे परत देण्यात यावेत, संस्थेची व संचालकांची बँक खाती गोठवावीत, संपूर्ण प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, मोठे कर्ज थकवणाऱ्यांची यादी जाहीर करून वसुली करावी, तसेच आरोपी संचालकांविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करावा, अशा मागण्यांचाही समावेश आहे. तसेच ठेवीदारांना पैसे परत मिळण्याबाबत कालबद्ध कृती आराखडा जाहीर करून दर पंधरा दिवसांनी प्रगती अहवाल सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाचे समन्वयक म्हणून सारंग पाचपुते, आशा ताटे व शिवाजी खोमणे कार्यरत असून त्यांनी सर्व ठेवीदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “हा केवळ आर्थिक प्रश्न नसून सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या बचतीचा प्रश्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, या प्रकरणामुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अनेकांनी आपल्या आयुष्यभराची बचत या संस्थेत गुंतवली असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

श्री संत निळोबाराय पालखी सोहळा नियोजनाची बुधवारी बैठक
उंबरेमध्ये भीम जन्मोत्सव सोहळा उत्साहात विद्यार्थ्यांचा सत्कार; भिमगीतांनी परिसर दणाणला
‘के. जे. सोमैया’च्या विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांत यश

श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथील साई सेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था प्रकरणी ठेवीदारांचा संताप तीव्र झाला असून, आपल्या हक्काच्या पैशांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ‘साई सेवा बचाव कृती समिती’च्या वतीने बुधवारी (दि. १५) तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात करण्यात आली.

“आमचे पैसे परत द्या, आमचा हक्क द्या; अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा देत ठेवीदारांनी प्रशासनावर दबाव वाढवला आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी झाले असून, प्रशासनाने तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

समितीच्या वतीने तहसील प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात ठेवीदारांच्या हितासाठी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांना मूळ रकमेसह व्याजाची तात्काळ परतफेड करावी, संस्थेचे अध्यक्ष, संचालक व संबंधितांवर एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करावी, तसेच या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा, अशी प्रमुख मागणी आहे.

याशिवाय संबंधितांची चल-अचल मालमत्ता जप्त करून लिलावातून ठेवीदारांना पैसे परत देण्यात यावेत, संस्थेची व संचालकांची बँक खाती गोठवावीत, संपूर्ण प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट करावे, मोठे कर्ज थकवणाऱ्यांची यादी जाहीर करून वसुली करावी, तसेच आरोपी संचालकांविरोधात लुकआऊट सर्क्युलर जारी करावा, अशा मागण्यांचाही समावेश आहे. तसेच ठेवीदारांना पैसे परत मिळण्याबाबत कालबद्ध कृती आराखडा जाहीर करून दर पंधरा दिवसांनी प्रगती अहवाल सादर करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनाचे समन्वयक म्हणून सारंग पाचपुते, आशा ताटे व शिवाजी खोमणे कार्यरत असून त्यांनी सर्व ठेवीदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. “हा केवळ आर्थिक प्रश्न नसून सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या बचतीचा प्रश्न आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे श्रीगोंदा तालुक्यात खळबळ उडाली असून ठेवीदारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. अनेकांनी आपल्या आयुष्यभराची बचत या संस्थेत गुंतवली असल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा समितीने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात प्रशासन पुढे कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

COMMENTS