Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी अनुभवी चेहरा म्हणून अमरसिंह पंडित यांना विधानपरिषदेची संधी द्यावी- शेख तय्यब

चकलांबा : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून माजी आमदार अमरसिंह पंडित यांना वि

बीड जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी पक्ष नेतृत्वाने अमरसिंह पंडितांना विधान परिषदेवर संधी द्यावी – बापू गाडेकर
शिक्षक-विद्यार्थी हितासाठी गतिमान प्रशासनाचा संकल्प : उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदेमा.आ.अमरसिंह पंडित यांनी केला उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे यांचा सत्कार
अतिक्रमण धारकांना तात्काळ पीटीआर वाटप करून घरकुल योजनेचा लाभ द्या-आ.विजयसिंह पंडितअमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत पीटीआर प्रश्नावर बैठक

चकलांबा : जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी अनुभवी आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून माजी आमदार अमरसिंह पंडित यांना विधानपरिषदेवर संधी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांमध्ये जोर धरू लागली आहे.
यासंदर्भात चकलांबा पंचायत समिती सदस्य शेख तय्यब यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राज्यात विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या पार्श्वभूमीवर पक्षाने योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात पक्षाला अधिक बळकटी देण्यासाठी अमरसिंह पंडित यांच्यासारख्या अनुभवी नेत्याची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची रणनीती कशी असेल याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. माजी राज्यमंत्री स्व. शिवाजीराव पंडित यांच्या राजकीय वारशाला पुढे नेणारे गेवराई मतदारसंघाचे माजी आमदार अमरसिंह पंडित आणि विद्यमान आमदार विजयसिंह पंडित हे राज्यातील अभ्यासू आणि अनुभवी नेतृत्व म्हणून ओळखले जातात, असेही शेख तय्यब यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, अमरसिंह पंडित यांनी आपल्या कार्यकाळात सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला आहे. त्यामुळे गेवराई मतदारसंघात सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून राहिल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांकडूनही त्यांना विधानपरिषदेची संधी देण्याची मागणी होत असल्याचे शेख तय्यब यांनी स्पष्ट केले. तसेच बीड जिल्ह्यात शांतता आणि विकास कायम ठेवण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज असून, त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या जनभावनेचा विचार करून अमरसिंह पंडित यांना विधानपरिषदेत संधी द्यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली.

COMMENTS