Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘कलेक्टर साहेब, ड्रममध्ये डिझेल द्या!’ नियम बदला आणि शेतकऱ्यांची खोळंबलेली मशागतीची कामे वाचवा; रामनाथ राजपुरे यांची मागणी!

https://www.youtube.com/watch?v=T4Zwrz-6_3Y पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय… त्यामुळे सध्या शेतकरी शेती मशागतीची कामं वेगाने उरकण्यात व्य

अशोक खरातला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; बचाव पक्षाचा कोठडी वाढवण्याच्या मागणीला जोरदार विरोध
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय; १.१२ लाख मताधिक्क्याने विरोधकांचा धुव्वा; सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’ सर्वांना सोबत घेणारे; माजी प्रदेशाध्यक्ष राजेश ठाकूर ; संगमनेरमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक उत्साहात

पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय… त्यामुळे सध्या शेतकरी शेती मशागतीची कामं वेगाने उरकण्यात व्यस्त आहे. पण ऐन मशागतीच्या नडणीलाच बळीराजासमोर डिझेलचं मोठं संकट उभं ठाकलंय. प्रशासनाच्या एका नियमामुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामं खोळंबली असून, ‘प्रशासनाने ड्रममध्ये डिझेल देण्याची मुभा द्यावी’, अशी आर्त हाक आता शेतकरी देऊ लागला आहे.
अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी परिसरातून हे विदारक चित्र समोर आलंय. रात्रीच्या वेळी बालंबिका पेट्रोलियम पंपावर डिझेलचा टँकर येताच, शेतकऱ्यांनी डिझेल मिळवण्यासाठी आपले ड्रम आणि ट्रॅक्टर रांगेत लावले. गेले चार दिवस डिझेलसाठी अशाच रांगा लागल्याने शेतीची कामं ठप्प झाली आहेत.
नियम असा आहे की, पेट्रोल पंपावर वाहन आणल्याशिवाय डिझेल दिलं जात नाही. पण कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथजी राजपुरे यांनी प्रशासनाच्या या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतलाय. मशागतीची प्रत्येक गाडी किंवा ट्रॅक्टर प्रत्येक वेळी पेट्रोल पंपावर आणणं शेतकऱ्याला शक्य होत नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पेट्रोल पंप चालकांना ड्रममध्ये डिझेल देण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
“पाऊस तोंडावर असल्याने शेतकऱ्यांना डिझेलची मोठी गरज आहे. शासनाने ड्रममध्ये डिझेल न देण्याची घेतलेली भूमिका चुकीची असून, यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कलेक्टर साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी यात तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना सहकार्य करावे.”
एकीकडे निसर्गाची साथ मिळेल की नाही याची चिंता आणि दुसरीकडे प्रशासकीय नियमांमुळे डिझेलसाठी करावी लागणारी वणवण, यामुळे शेवगावचा शेतकरी संकटात सापडला आहे. आता तरी जिल्हाधिकारी साहेब यावर तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS