Homeताज्या बातम्या

कर्नाटकात खडक कोसळून सात मजुरांचा मृत्यू

बेंगळुरू : कर्नाटक राज्यातील बेंगळुरूजवळील दगड खाणीत गुरुवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. दक्षिण बेंगळुरू जिल्ह्यातील मदपट्टणा परिसरातील दगड प्रक्र

मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये
लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; 14 मुलांचा होरपळून मृत्यूपंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर
पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीला भीषण आग
स्टोन क्रशरवर काम करणाऱ्या मजुरांवर काळाचा घाला : दगडी खाणीत खडक कोसळून 7  ठार


बेंगळुरू : कर्नाटक राज्यातील बेंगळुरूजवळील दगड खाणीत गुरुवारी पहाटे भीषण दुर्घटना घडली. दक्षिण बेंगळुरू जिल्ह्यातील मदपट्टणा परिसरातील दगड प्रक्रिया केंद्रात काम सुरू असताना मोठा खडक कोसळल्याने सात मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे चाळीस फूट उंचीवरून प्रचंड आकाराचा खडक अचानक खाली कोसळला. त्या वेळी खाण परिसरात अनेक मजूर काम करत होते. खडकाखाली काही मजूर दबले गेल्याने मोठी जीवितहानी झाली. दुर्घटनेच्या वेळी एकूण अठरा मजूर कामावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये बिहार आणि आसाम येथील मजुरांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधितांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. जखमी मजुरांना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीय पथक त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसराला सुरक्षा कवच देण्यात आले असून ढिगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आणखी कोणी मजूर अडकले आहेत का, याचीही कसून तपासणी केली जात आहे.
दरम्यान, ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. खाण परिसरात सुरक्षाविषयक नियमांचे पालन करण्यात आले होते की नाही, तसेच कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला होता का, याचीही सखोल तपासणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS